शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात आढळले १२४ जातींचे ३९५२ पक्षी, प्रथमच आढळले ‘फॉरेस्ट वॅगटेल’ व ‘लोटेन्स सनबर्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 02:57 IST

पर्यावरण दक्षता मंडळ व होप यांनी आयोजित केलेली ठाणे पक्षी गणनेची १४ वी फेरी रविवारी पार पडली. त्यात हिवाळ््यात १२४ जातींचे ३९५२ पक्षी ठाण्यात आढळून आले. प्रथमच ‘फॉरेस्ट वॅगटेल’ व ‘लोटेन्स सनबर्ड’ या दोन जातींची नोंद झाली.

ठाणे : पर्यावरण दक्षता मंडळ व होप यांनी आयोजित केलेली ठाणे पक्षी गणनेची १४ वी फेरी रविवारी पार पडली. त्यात हिवाळ््यात १२४ जातींचे ३९५२ पक्षी ठाण्यात आढळून आले. प्रथमच ‘फॉरेस्ट वॅगटेल’ व ‘लोटेन्स सनबर्ड’ या दोन जातींची नोंद झाली.या दोन्ही संस्थांच्यावतीने दर तीन ते चार महिन्यांनी ठाणे पक्षी गणना केली जाते. यंदाच्या १४ व्या गणनेत ५१ पक्षीनिरीक्षक व पक्षीप्रेमींनी भाग घेतला होता. नेहमी प्रमाणे ठाणे शहराच्या आठ विविध भागांत सकाळी तीन तास गणना करण्यात आली. या गणनेत १२४ जातींचे ३९५२ पक्षी आढळून आले. यावेळी आजपर्यंत नोंद न झालेल्या ‘फॉरेस्ट वॅगटेल’ व ‘लोटेन्स सनबर्ड’ या दोन जातींची नोंद पडले. खिडकाळी या विभागात झाली. या दोन जाती धरून २०१३ पासून चालू झालेल्या या गणनेत एकूण २३० जातींच्या पक्षांची नोंद करण्यात आली आहे. या गणनेत ठाणे पूर्व भागात एक चातक पक्षी (पाईड कक्कू) आढळून आला. तो जून मध्ये आपल्याकडे आफ्रिका खंडातून स्थलांतर करून येतो व अॉक्टोबरमधे आफ्रिकेत परत जातो. हे पिल्लू लहान किंवा ऊशीरा जन्मल्याने पालकांबरोबर स्थलांतर करू शकले नसावे असा अंदाज पक्षीनिरीक्षकांनी व्यक्त केला. हा काळ पक्षी स्थलात्ांराचा असल्याने या काळात अधिक पक्षी दिसून येतात. स्थलांतराच्या काळात ते खाडी किनारी जास्त आढळतात. या गणनेत हिवाळी पक्षी जास्त आढळून आले. हीच पक्षी गणना मार्चमध्ये घेतली तर आताच्या पक्षी गणनेच्या तुलनेत १० ते १५ प्रजातींचा फरक दिसून येतो अशी माहिती आयोजक रविंद्र साठ्ये यांनी दिली. पुढील १५ वी ठाणे पक्षी गणना ११ मार्च २०१८ रोजी होईल, असे त्यांनी सांगितले.- १४ व्या पक्षी गणनेत पडले-खिडकाळी भागात सर्वात जास्त म्हणजेच ७२ जातींचे पक्षी दिसले. हा भाग फॉरेस्ट आणि खाडीलगत असल्याने तसेच, या ठिकाणी माणसाचा अधिवास कमी आहे. त्यामुळे, पक्ष्यांना मोकळीक मिळते. म्हणूनच या भागांत जास्त पक्षी आढळून आले असल्याचे साठ्ये यांनी सांगितले. या आधी १३ अॉगस्ट रोजी घेतलेल्या १३ व्या गणनेत ठाणे पूर्व भागात सर्वात जास्त म्हणजेच ४१ जातींचे पक्षी दिसले होते.- ठाणे पूर्व खाडीचा भाग, कोलशेत रोड, मुंब्रा हिल्स आणि खाडी, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील आजूबाजूचा परिसर, ठाणे पश्चिम खाडीचा भाग, संजय गांधी नॅशनल पार्क, मानपाडा, येऊर, पडले खिडकाळी या आठ भागांत पक्षीनिरीक्षकांना विभागून दिले जाते.

टॅग्स :thaneठाणे