शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सोळावी पक्षिगणना : जून महिन्यात आढळले १०३ जातींचे ३९३४ पक्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 04:23 IST

पर्यावरण दक्षता मंडळ व होप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ठाणे पक्षिगणनेची सोळावी फेरी रविवारी पार पडली. या गणनेत पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजेच जून महिन्यात १०३ जातींचे ३९३४ पक्षी आढळून आले.

ठाणे : पर्यावरण दक्षता मंडळ व होप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ठाणे पक्षिगणनेची सोळावी फेरी रविवारी पार पडली. या गणनेत पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजेच जून महिन्यात १०३ जातींचे ३९३४ पक्षी आढळून आले. या गणनेचे वैशिष्ट्य म्हणजे येऊरमध्ये काळा गरुड हा दुर्मीळ पक्षी दिसून आला. तसेच, पाच पावसाळी पाहुण्यांचीही नोंदही झाली.या दोन्ही संस्थांच्या वतीने दर तीन ते चार महिन्यांनी पक्षिगणना केली जाते. पंधरावी गणना मार्च महिन्यात पार पडली. यंदाच्या सोळाव्या गणनेत ४७ पक्षिनिरीक्षक व पक्षिप्रेमींनी भाग घेतला होता. नेहमीप्रमाणे ठाणे शहराच्या आठ विविध भागांत सकाळी गणना करण्यात आली. २०१३ पासून चालू झालेल्या या गणनेत आतापर्यंत एकूण २३९ जातींच्या पक्ष्यांची नोंद झाली. ओरिएण्टेल ड्वार्फ किंगफिशर (तिबोटी खंड्या), पाइड ककू (चातक), ग्रे बेलीड ककू (कारुण्य कोकिळा), इंडियन ककू (कोकीळ), कॉमन हॉक ककू (पावशा) हे पावसाळी पाहुणे प्रजननासाठी शहरात आल्याचे पक्षिनिरीक्षकांना आढळून आले. मार्चमध्ये पंधरावी गणना पार पडली. त्यावेळी १३५ जातींचे ३७३२ पक्षी आढळून आले होते. या गणनेत ५९ पक्षिप्रेमी-पक्षिनिरीक्षकांनी भाग घेतला. या गणनेचे वैशिष्ट्य म्हणजे येऊरमध्ये दोन टीम पाठवण्यात आल्या असल्याचे आयोजक रवींद्र साठये यांनी सांगितले. या गणनेत पडले-खिडकाळी भागांत सर्वाधिक म्हणजेच ७७ जातींचे पक्षी आढळून आले होते. मार्चमध्ये काही पक्षी स्थलांतरित व्हायचे होते, त्यामुळे यंदाच्या गणनेच्या तुलनेत मार्च महिन्यातील गणनेत अधिक जातींचे पक्षी आढळून आले होते, असे साठये यांनी सांगितले. डिसेंबर महिन्यात चौदावी पक्षिगणना पार पडली होती. यावेळी हिवाळ्याच्या दिवसांत ठाण्यात १२४ जातींचे ३९५२ पक्षी आढळून आले होते, तर या गणनेत प्रथमच ‘फॉरेस्ट वॅगटेल’ व ‘लोटेन्स सनबर्ड’ या दोन जातींची नोंद झाली होती.

टॅग्स :wildlifeवन्यजीवthaneठाणे