शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
2
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
3
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
4
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
5
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
6
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
7
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
8
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
9
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
10
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
11
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
12
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
13
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
14
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
15
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
16
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
17
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
18
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
19
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
20
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 

कल्याण-डोंबिवलीत वर्षभरात आगीच्या ३८५ घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:28 IST

एप्रिल ते मार्च या वर्षभरात कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात ३८५ ठिकाणी आगी लागल्या. याशिवाय, झाडे पडण्याच्या घटनांचे प्रमाणसुद्धा जास्त आहे

सचिन सागरेकल्याण : एप्रिल ते मार्च या वर्षभरात कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात ३८५ ठिकाणी आगी लागल्या. याशिवाय, झाडे पडण्याच्या घटनांचे प्रमाणसुद्धा जास्त आहे. मात्र, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने अशा घटनांना तोंड देताना चांगलीच दमछाक होताना दिसते.कुठेही आग लागली किंवा अन्य कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अग्निशमन विभागाला पाचारण केले जाते. कल्याण-डोंबिवली शहरांसह भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वाडा, शहापूर, भिवंडी, मुरबाड आदी आसपासच्या शहरांतही ही सेवा पुरवली जाते. या कर्मचाऱ्यांना आग विझवण्यासह प्राणी पकडणे, अडकलेल्या प्राण्यांची किंवा पक्ष्यांची सुटका करणे, पाण्यात बुडालेल्यांना बाहेर काढणे, कोसळलेल्या इमारतीतील रहिवाशांचे प्राण वाचवणे आदी जबाबदारीही पार पाडावी लागते. विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या काळात आगीच्या ३८५ तसेच झाडे पडण्याच्या ५१५ आणि इतर ३०४ घटना घडल्या आहेत. महापालिकेच्या अग्निशमन विभागात पुरेसे मनुष्यबळ नाही. २२८ मंजूर पदे असून त्यापैकी अवघे १०७ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. अपुºया संख्येमुळेच कामाचा अतिरिक्त ताण कर्मचाºयांना सहन करावा लागतो आहे.टिटवाळा शहराची लोकसंख्या सध्या वाढते आहे. त्याठिकाणी जाण्यासाठी अग्निशमन दलाला लागणारा कालावधी लक्षात घेता अग्निशमन कार्यालय असणे आवश्यक आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे. त्यातही आवश्यक कर्मचारी मिळाल्यास आम्ही येथे तातडीने अग्निशमन कार्यालय सुरू करू.- सुधाकर कुलकर्णी (फायर आॅफिसर)