शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

१५ निवडणुकांत लढले ३८ पक्ष; सहा पक्षांच्या खासदारांनी गाठली दिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:36 IST

काँग्रेसचे सर्वाधिक १० खासदार विजयी

- अजित मांडके ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी, पालघर या लोकसभा मतदारसंघांत गेल्या १५ निवडणुकांमध्ये ३८ पक्ष सहभागी झाले होते. त्यानुसार, यातील सहाच पक्षांना संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी लाभलेली आहे. त्यात सर्वाधिक १० वेळा भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसचे खासदार निवडून गेले असून, त्याखालोखाल भाजपने पाच वेळा विजय मिळवला आहे.ठाणे जिल्ह्यात ठाणे लोकसभा मतदारसंघाची निर्मिती १९५१ मध्ये झाली असली, तरी त्यानंतर भिवंडी, डहाणू अशा मतदारसंघांत विभागणीसुद्धा झाली होती. तर, १९६२ मध्ये ठाणे आणि भिवंडी असासुद्धा हा मतदारसंघ होता. त्यानंतर, खऱ्या अर्थाने १९७७ मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. त्यानंतर, २००९ मध्ये ठाणे जिल्ह्याची पुनर्रचना होऊन पालघर, कल्याण आणि भिवंडी अशी लोकसभा मतदारसंघांची विभागणी झाली. त्यात, पालघर हा जिल्हाच वेगळा झाला आहे. हे सर्व मतदारसंघ मिळून नोंदणीकृत ३८ पक्षांनी निवडणुका लढवल्या आहेत. त्यात, ठाणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसने १० वेळा विजय संपादन केला आहे. याच मतदारसंघातून शिवसेना पाच, राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टी एक आणि सीपीआयने एकदा, जनता पार्टीनेसुद्धा एकदा विजय मिळवला आहे. पूर्वाश्रमीच्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसने १० वेळा, तर भारतीय जनता पार्टीने दोन वेळा विजय संपादन केला आहे. २००९ मध्ये ठाणे मतदारसंघाची पुनर्रचना होऊन कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांची निर्मिती झाली. त्यावेळी २००९ आणि २०१४ मध्ये कल्याणमधून शिवसेना विजयी झाली, तर भिवंडीत २००९ मध्ये काँग्रेस आणि २०१४ मध्ये भाजपला विजयी मिळवता आला आहे.१९७७ नंतर कॉँग्रेस नामशेषजिल्ह्यातील तीनही मतदारसंघ हे एकेकाळी कॉँग्रेसचे बालेकिल्ले होते. कॉँग्रेसमध्ये फूट पडूनही या जिल्ह्याने कॉँग्रेसवर विश्वास दाखवला होता. मात्र, १९७७ पासून ठाणे आणि कल्याण मतदारसंघांत कॉँग्रेसची पीछेहाट झालेली आहे. मात्र, २००९ मध्ये भिवंडीत काँग्रेसने विजय मिळवला होता. आता आघाडीच्या जागावाटपातही तीनपैकी ठाणे आणि कल्याण राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वाट्याला गेला आहे. तर, भिवंडी काँग्रेसकडे आला आहे. काँग्रेसचे येथून १० खासदार निवडून गेले आहेत. त्याखालोखाल शिवसेना पाच, भाजप दोन, सीपीआय दोन आणि जनता पार्टी व राष्टÑवादीचा प्रत्येकी एक खासदार संसदेत गेले आहेत. परंतु, काँग्रेसचे अस्तित्व मात्र १९७७ पासून संपुष्टात आले आहे, तर १९८४ मध्ये पुन्हा काँगे्रसने विजय मिळवला होता. त्यानंतर, मात्र या पक्षाचे अस्तित्व संपले.हे लढले पक्ष : तीनही मतदारसंघ मिळून भारतीय राष्टÑीय कॉँग्रेस, समाजवादी पक्ष, भाजप, राष्टÑवादी, शिवसेना, मनसे, आप, भारिप, दूरदर्शी, लोकदल बी, बहुजन समाज, जनता पार्टी, बसपा, जनता दल, एसएमसी, सीपीआय, तिवारी (काँ.), एसजेपीएम, राष्टÑीय समाज पक्ष, नॅपॅपा, अभासे, ईयूयूसी, हिंजपा, प्रारिपा, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्टÑीय क्रांतिकारी, क्रांतिकारी जयहिंद सेना, नवभारत निर्माण पार्टी, भारिप बहुजन महासंघ, इंडियन युनियन मुस्लिम लीग, क्रांतिकारी महाराष्टÑ, राष्टÑवादी जनता पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी आदी छोट्यामोठ्या पक्षांनी निवडणूक लढवली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019