शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीतील मृतांच्या वारसांना 38 लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 23:37 IST

यंदा, ठाणे जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पाऊस झाला आहे. मात्र, जून महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील समुद्रकिनारी भागातील घरांचे व शेतीचे मोठे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे :  ठाणे जिल्ह्यात १ जून २०२० ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या नऊ जणांच्या वारसांना तर, वीज पडून जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना मिळून ३८ लाख ८३ हजारांची मदत देण्यात आली. तर, लहानमोठ्या दुधाळ जनावरांसह ओढकाम करत असलेल्या मोठ्या जनावरांसाठी एक लाख ४० हजारांची मदत दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

यंदा, ठाणे जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पाऊस झाला आहे. मात्र, जून महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील समुद्रकिनारी भागातील घरांचे व शेतीचे मोठे नुकसान झाले. या चक्रीवादळाचा फटका ठाणे जिल्ह्यातील शेतपिकांसह जनावरांनादेखील बसला. जिल्ह्यात अनेक जण वीज पडून जखमी झाले. तर, अनेकांना प्राणदेखील गमवावे लागले आहे. अशा या नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्यांना व मृतांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येत असते. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात जून  ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, शहापूर आणि मुरबाड या सात तालुक्यांतील बाधितांचे पंचनामे केले असून त्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीचे वाटपदेखील केल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार राजराम तवटे यांनी दिली. 

यामध्ये जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे शेतीचे नुकसान झाले होते. तर, जून ते ऑक्टोबर या काळात वीज पडून व मुसळधार पावसामुळे नैसर्गिक आपत्ती ओढवून जिल्ह्यात नऊ जणांचा बळी गेला आहे. या मृतांच्या नातेवाइकांना व वीज पडून जखमी झालेल्यांना ३७ लाख ८३ हजारांची मदत देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

त्या’ शेतकऱ्यांना दीड लाखांची मदतजिल्ह्यात काही पशू व जनावरांचे मृत्यू झाले होते. या मृत पावलेल्या जनावरांसाठीची एक लाख ४० हजारांची मदत संबंधित शेतकऱ्यांंना देण्यात आली.