शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

३७ चौक होणार चकाचक; ठाणे महापालिका करणार नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:12 IST

शहर खड्डेमुक्त करण्याचा संकल्प

ठाणे : शहरातील रस्ते चकाचक करण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार, मागील महासभेत तब्बल १७१ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. या रस्त्यांबरोबरच शहरातील ३७ चौक खड्डेमुक्त करण्याची महापालिकेने तयारी सुरू केली आहे. यानुसार, तीनहातनाका, नितीन कंपनी आदींसह १२ चौकांचे मास्टिक अस्फाल्ट पद्धतीने तर शहरातील २५ चौकांचे यूटीडब्ल्यूटी पद्धतीने सुशोभीकरण करण्यात येणार आहे.महापालिका क्षेत्रात ३५६ किमीचे रस्त्यांचे जाळे आहे. मात्र, प्रत्येक पावसाळ्यात या रस्त्यांवर खड्डे पडल्याचे दिसून येत असते. रस्त्यांची संख्या कमी असली, तरी शहराची लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्या वेगाने वाहनांची संख्यादेखील तितकीच वाढत आहे. वाहनांच्या तुलनेत रस्ते अपुरे पडू लागल्याने प्रशासनाकडून रस्ते रुंदीकरण मोहीम राबविली जात आहे. नव्या वर्षातही रस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्याचबरोबर विकास आराखड्यातील रस्ते तयार करण्याची कामेही हाती घेतली आहेत. शहर खड्डेमुक्त राहावे म्हणून सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार केले जात आहेत. असे असले तरी दरवर्षी पावसाळ्यात शहरातील डांबरी रस्त्यांवर तसेच चौकांमध्ये खड्डे पडत असल्याचे चित्र दिसून येते. यामुळे वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी होते. या पार्श्वभूमीवर सर्वच चौकांना खड्डेमुक्त करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत.या चौकांचा आहे समावेशयात कॅडबरी चौक, तीनहातनाका चौक, नितीन कंपनी चौक, माजिवडा परिसरातील पाच चौक, गोयंका चौक, गोखले मार्गावरील चौक आणि आर मॉलजवळील चौक अशा १२ चौकांमध्ये मास्टिक अस्फाल्ट पद्धतीने कामे करण्यात येणार आहेत. तर, स्वामी विवेकानंद चौक, टेंभीनाका चौक, चिंतामणी चौक, कोर्टनाका चौक, जेल तलाव चौक, नरवीर तानाजी चौक, गडकरी चौक, डॉ. आंबेडकर चौक, माजिवडा जंक्शन, ब्रह्मांड आझादनगर चौक.मानपाडा जंक्शन, पातलीपाडा जंक्शन, सरस्वती शाळेसमोरील चौक, यशोधननगर चौक, क्र ांतिवीर चौक, मुंब्रा पोलीस स्थानक चौक, संजयनगरनाका, शंकर मंदिरनाका, किस्मत कॉलनी चौक, कौसा कबरस्तान चौक, अ‍ॅक्रोड कॉम्प्लेक्स चौक, हिलन बेकरी चौक, पाकिजा बेकरी चौक, सनशाइननगर चौक अशा २५ चौकांत यूटीडब्ल्यूटी पद्धतीने नूतनीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका