शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ताकरातून तिजोरीत ३७ कोटींचा महसूल जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 00:40 IST

मीरा-भाईंदर महापालिकेला आधार : ८० हजार ५०० नागरिकांनी केला भरणा

- धीरज परबमीरा रोड : कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या मीरा-भार्इंदर महापालिकेला शहरातील ८० हजार ५०० मालमत्ताधारक नागरिकांनी मोठा दिलासा दिला आहे. या करधारक नागरिकांनी जेमतेम दोन महिन्यांत तब्बल ३७ कोटी १४ लाखांचा मालमत्ता कर पालिका तिजोरीत जमा केला आहे. त्यामुळे पालिकेला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.मार्चअखेरपासून कोरोनामुळे मालमत्ता कराची देयकेच नागरिकांना दिली गेली नव्हती. त्यामुळे पालिकेची करवसुली ठप्प झाली होती. एकीकडे कोरोनाच्या प्रभावामुळे पालिकेचे आर्थिक उत्पन्न जवळपास ठप्प असताना कोरोनासाठीचा वाढता खर्च आणि प्रशासकीय खर्च यामुळे पालिकेची आर्थिक कोंडी झाली आहे. आर्थिक चणचणीत सापडलेल्या महापालिकेला आधार देण्याचे काम शहरातील प्रामाणिक करदात्या नागरिकांनी केले आहे.पालिकेच्या करविभागाच्या नोंदीनुसार शहरात तीन लाख ५७ हजार मालमत्ता खातेदार आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात कराची मागणी २७१ कोटी रुपये इतकी आहे. पण, कोरोनामुळे एप्रिलपासून पालिकेने करवसुली तर सोडाच कराची बिलेही काढली नव्हती. आॅगस्टपासून नागरिकांना मालमत्ता कराची देयके देण्यास सुरुवात झाली. तर १३ आॅगस्टपासून पालिकेने करवसुली सुरू केली. कोरोनामुळे याला किती प्रतिसाद मिळेल हा प्रश्न होता. पण १३ आॅगस्टपासून रविवार ४ आॅक्टोबरपर्यंत तब्बल ८० हजार ५०० करदात्या नागरिकांनी ३७ कोटी १४ लाख रुपये इतका मालमत्ताकर भरला आहे.३० हजार नागरिकांनी भरला आॅनलाइन करकरदात्यांपैकी ३० हजार जणांनी १३ कोटी ५४ लाखांचा कर आॅनलाइन भरला आहे. तर ५० हजार ५०० नागरिकांनी प्रत्यक्ष पालिका कार्यालयांमध्ये जाऊन कर भरणा केला आहे. ती रक्कम २३ कोटी ६० लाख रुपये इतकी आहे. पहिल्या बिलाची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती.पण देयके एक महिना उशिरा वाटप करण्यात आल्याने आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी नागरिकांना नाहक व्याज लागू नये म्हणून कर भरण्याची मुदत एका महिन्याने म्हणजेच ३१ आॅक्टोबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे ३१ आॅक्टॉबरनंतर कर भरल्यास त्यावर व्याज आकारले जाणार आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक