शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्याच्या गांवखेड्यांमधील शाळांची रंगरंगोटी, पुनर्बांधणीसह ऐन दिवाळीत लक्ष फाऊंडेशनकडून विद्यार्थ्यांना ३७ सायकली!

By सुरेश लोखंडे | Updated: November 13, 2023 18:46 IST

येथील जिल्हा परिषदेच्या नियंणात जिल्ह्यातील गांवखेड्यातील प्राथमिक शाळा सक्रीयपणे सुरू आहे.

ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या नियंणात जिल्ह्यातील गांवखेड्यातील प्राथमिक शाळा सक्रीयपणे सुरू आहे. त्यापैकी मुरबाड, अंबरनाथ तालुक्यातील तब्बल सहा शाळांची निवड करून त्यांच्या पुनर्बांधणीसह, रंगरंगाेटी करीत शाळांचे रूपडे बदलापूर येथील लक्ष फाउंडेशनच्या ‘व्हील्स ऑफ होप’ हा उपक्रमातून बदलवले आहे. ऐवढेच नव्हे तर ऐन दिवाळीत लांबच्या शाळेत पायी जाणाऱ्या मुलांसाठी ३७ सायकीलींचे वाटप ऐन दिवाळीत करून विद्यार्थ्या चा आनंद दुगुणीत केला आहे. शहरातील मुलांप्रमाणे ग्रामीण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना त्यांची शाळा हवीहवीशी वाटावी. त्यांनी नियमित शाळेत येउन उच्च शिक्षित व्हावे, त्यांना शाळेची गाेडी लागावी आणि दुर्गम भागातील गांवखेडे उच्चशिक्षित व्हावे या हेतूने बदलापूर येथील लक्ष फाऊंडेशच्या अभिनव संकल्पनेतून ‘सिनिक्रॉन टेक्नॉलॉजीस, फ्लो ग्रुप कंपनी आणि विशाल भालेकर यांच्या आर्थिक पाठबळातून शालेय पातळीवर विविध उपक्रम हाती घेतले आहे. दिवाळी आधीच गांवखेड्याच्या शाळांची रंगरंगाेटी करून त्याचे दयनिवस्था दूर केली. आता ऐन दिवाळीत विद्यार्थ्या ना उच्च दर्जा च्या सायकली देउन त्यांना माेठा धिलासा दिला.

 बदलापूर परिसरातील अनेक आदिवासी पाड्यातील आदिवासी विद्यार्थी यांना इयत्ता ५ वी नंतर पुढील शिक्षणासाठी रोज रानावनातून ४ ते ५ किलोमीटर पायपीट करीत शहरातील शाळेत जावे लागत. शिक्षणाचा हाच खडतर प्रवास सुखर करण्यासाठी व्हील्स ऑफ होप हा अनोखा उपक्रम लक्ष फाऊंडेशनकडून हाती घेण्यात आला. मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा लव्हाळी, शिखरे पाडा, वाशिवली भाकरी ,उंबरवेढे,धारोळ मांडव्याची वाडी पाड्यांमधील विद्यार्थ्यांना ३७ नव्या, कोऱ्या, उत्कृष्ट सायकलींचे वाटप केले. ह्या विद्यार्थ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने प्रकाश पसरविला.

या सायकलींचा स्विकार करताना या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य व उत्साह नमोल आणि हृदयस्पर्शी होता. या सायकलीच्या वाटपासाठी खास लक्ष फाउंडेशनचे अध्यक्ष शिरीष पाटील, कार्यवाहक हितेश ठाकरे, पांडुरंग शिर्के, यांनी महत्वाची भूमिका बजावून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हस्य फुलवले.