अलिबाग : अतिवृष्टीमुळे गाव-वस्त्यांवर दरडी कोसळण्याचा दाट धोका असणारी एकूण 36 गावे रायगड जिल्ह्यात निष्पन्न झाली असून या गावांतील ग्रामस्थांचे स्थलांतर करणो अत्यावश्यक असल्याचा अहवाल रायगड जिल्ह्यातील तहसिलदारांनी दिला आहे. गाव-वस्त्यांवर दरडी कोसळण्याच्या धोक्यांच्या पाश्र्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना संभाव्य दरडग्रस्त गावांची पहाणी करुन धोकेविषयक अहवाल देण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिले होते. त्यानुसार हे अहवाल तहसिलदारांनी दिले आहेत.
दरम्यान या 36 गावांपैकी महाड तालुक्यातील दासगांव, कोंडीवते, जुई, पोलादपूर तालुक्यातील कोतवाल बूद्रूक, कोतवाल खूर्द, कोंढवी, तुटवली, रोहा तालुक्यात आरेबुद्रूक, खालापूर तालुक्यात सुभाषनगर व काजूवाडी या दहा गांवांवर सन 2क्क्5 मध्ये दरडी कोसळून जीवितहानी मोठय़ा प्रमाणात झाली होती. गेल्या नऊ वर्षात या दहा गावांवरील दरडी कोसळण्याचा धोका दूर करणारी उपाययोजना शासकीय यंत्रणोच्या माध्यमातून होवू शकलेली नाही, हेही या निमित्ताने उघडकीस आले आहे.
दरडग्रस्त गांवांचा अहवाल आणि तेथील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविणो अत्यावश्यक असे अहवाल देवून जिल्ह्यातील 15 तहसिलदार व 15 नायब तहसिलदार मंगळवारपासून ‘काम बंद आंदोलन’ करुन संपावर गेले आहेत. महसूल कर्मचारी गेल्या 1 ऑगस्टपासूनच संपावर आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यात या 36 धोकादायक गावांतील ग्रामस्थांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर कोण करणार असा यक्षप्रश्न सध्या रायगड जिल्हा प्रशासनासमोर आहे. (विशेष प्रतिनिधी)
पोलादपूर : गेले दोन दिवस महाबळेश्वर - पोलादपूर परिसरात पावसाची संततधार चालू असल्याने आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने काल संध्याकाळपासून महाबळेश्ववर - पोलादपूर मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.
सोमवारी संध्याकाळी 5.3क् च्या दरम्यान पोलादपूरपासून 21 कि.मी. अंतरावर रानकडसरी व दाभिळढोंगीच्या मध्यभागी संपूर्ण डोंगर खाली येऊन रस्ता पूर्णपणो बंद झाला. सार्व. बांधकाम उपविभाग पोलादपूरने या मार्गावर कायमस्वरुपी जेसीबी ठेवला असल्याने दरड काढण्याचे काम ताबडतोब चालू केले. मात्र, जसजशी माती बाजूला करण्याचे काम चालू होते तसा वरचा डोंगर पुन्हा खाली घसरुन रस्ता पूर्णपणो बंद होत होता.
आज सकाळी 7 वाजल्यापासून दरड बाजूला करण्याचे काम चालू असून दोन जेसीबी कायम स्वरुपी कार्यरत ठेवूनही दुपार्पयत वाहतूक ठप्प होती. संध्याकाळर्पयत एकेरी वाहतूक चालू केली जाईल, अशी माहिती संबंधित सूत्रंनी दिली.
दरम्यान, पोलादपूर तहसिल कार्यालयाचे अधिकारी डी.वाय.एस.पी. देशमुख, पोलीस निरीक्षक अंधारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.
दरवर्षी पावसाळय़ात आंबेनळी घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार चालू असतात. या घाटात गब्रियल पध्दतीने वायरोप करणो गरजेचे असून संबंधित खाते तिकडे दुर्लक्ष करत आहेत. महाबळेश्वर हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असून मुंबई व कोकणातून या मार्गावर मोठय़ाप्रमाणात वाहतूक चालू असते. (वार्ताहर)
खालापूर : खोपोली शहरातील काजूवाडी येथे जमीन खचण्याचा प्रकार घडला असल्याने टेकडीवर असणा:या घरांना धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी दुपारी फुटपाथच्या बाजूला असणारी दरड खालील घरांवर कोसळण्याचा प्रकार घडल्याने भूस्खलनचा धोका वाढला आहे. आपत्ती प्रशासनाने येथील रहिवाशांना नोटीसा देवून स्थलांतरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत .
खोपोली शहराला दरडीचा धोका या बाबतचे वृत्त अलीकडे लोकमतने प्रसिद्ध केले असताना शहरातील सुभाष नगर आणि काजू वाडी या ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असल्याचे वास्तव आपत्ती विभागाच्या निदर्शनास आणून दिले होते. दरम्यान मंगळवारी दुपारी काजू वाडी टेकडीवर राहणा:या रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण होणारी घटना घडली आहे . टेकडीवर जमीन खचण्याचा प्रकार घडला असून घरांवर दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे . टेकडीवरील दरड खाली असणा:या घरांवर कोसळल्याने आपत्ती प्रशासन जागे झाले आहे . वन विभागाच्या मालकीची हि टेकडी असून गेल्या काही वषात अनिधकृतरीत्त्या या ठिकाणी मानवी वस्ती वाढली आहे .
दरड कोसळल्याची घटना कळताच पालिका मुख्याधिकारी सुदाम धुपे ,नागराधाक्ष दत्तात्नय मसुरकर ,उपनागराधाक्ष रमेश जाधव,कय्युम पाटील , पोलिस उप विभागीय अधिकारी बी पी कल्लुरकर ,नायब तहसीलदार उत्तम कुंभार, खालापूर वन क्षेत्नपाल सोनावणो आदींनी टेकडीची पाहणी केली. जमीन खचण्याचा झालेला प्रकार आपत्तीजनक असल्याने जिल्हाधिकारी यांना या घटनेची माहिती देण्यात आली .
नगराध्यक्ष मसुरकर, मुख्याधिकारी धुपे ,पोलिस आणि महसूल प्रशासन यांनी एकत्रित यावर कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने येथील रहिवाशांना अन्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना केल्या आहेत . किमान पन्नास ते साठ कुटुंबांचे स्थलांतरण केले जाणार असून त्यांची सोय शाळा क्र मांक् एकची इमारत, ज्येष्ठ नागरिक सभागृह ,काटरंग सामाजिक सभागृहात,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह शास्त्नी नगर, भानावज येथील सभागृहात करण्यात आली.
पेण, रोहा, श्रीवर्धन, खालापूर व पनवेलमधील 1क् गावांना धोका
दरडग्रस्ततेचा तीव्र धोका असणा:या उर्वरित गावांपैकी रोहा तालुक्यांत आरेबूद्रूक, तिसे, वाळंजवाडी, नेहरुनगर, घोसाळे ही पाच, पेण तालुक्यात मंगोशी व तूरमाळ ही दोन, खालापूर तालुक्यांत सुभाषनगर व काजूवाडी ही दोन तर पनवेल तालुक्यात हरिग्राम हे एक अशी एकूण 1क् गावे आहेत.
महाड तालुक्यातील
17 गावांना दरडग्रस्ततेचा तीव्र धोका
दरडग्रस्ततेचा धोका निर्माण झालेल्या या 36 गावांमध्ये सर्वाधिक 17 गावे महाड तालुक्यात असून त्यामध्ये सव, चोचिंदे कोंड, दासगांव, कोथेरी, कोंडीवते, करंजखोल, नांदगाव तर्फे बिरवाडी, लोअर तुडील, जूई, सिंगरकोंड, मोरेवाडी, आंबिवली बुद्रुक, कोथेरीवाडी, कूर्ले दंडवाडी, सांदोशी-हेटकरकोंड, हिरकणीवाडी, कडसंराई-लिंगाणा या गावांचा समावेश आहे.
1क् गावांना दरडग्रस्ततेचा तीव्र धोका
महाड तालुक्यास खेटूनच असलेल्या पोलादपूर तालुक्यात 1क् गावे दरडग्रस्ततेचा धोका असणारी असून त्यामध्ये कोतवाल बूद्रूक, कोतवाल खुर्द, धामणदेवी, केवनाळे,कोंढवी, तुटवली, ओंबळी, बोरावले, पळसुरे, भोगाव-निलंगेवाडी या गावांचा समावेश आहे.