शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गणवेशाच्या नावाखाली ३६ लाखांचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 06:46 IST

कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या वाहकाकडून कंत्राटदार गणवेशाचे अतिरिक्त तीन हजार रु पये घेत असून अशा प्रकारे त्याने ३६ लाख रु पयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप बुधवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला.

ठाणे -  कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या वाहकाकडून कंत्राटदार गणवेशाचे अतिरिक्त तीन हजार रु पये घेत असून अशा प्रकारे त्याने ३६ लाख रु पयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप बुधवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. यावर जोरदार खडाजंगी झाल्यानंतर अखेर प्रभारी सभापती राजेंद्र महाडिक यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून या प्रकरणात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या ठाणे परिवहनसेवेत केवळ ४०० वाहक कंत्राटी पद्धतीने घेण्याचा करार झाला आहे. परंतु, असे असताना या कंत्राटदाराने ९०० वाहक घेतले आहेत. त्यांच्याकडून गणवेशाच्या नावाखाली प्रत्येकी तीन हजार रु पये घेतले असल्याचा आरोप परिवहन सदस्य संजय भोसले यांनी केला. या माध्यमातून तब्बल ३६ लाख रु पयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सदस्य दशरथ यादव यांनी हा ठेकेदार गणवेशाचे तीन हजार रु पये घेतोच, शिवाय जर एखादा कामगार एक दिवस गैरहजर राहिल्यास त्याच्या वेतनातून एक हजार रु पये वजा केले जात असल्याचा गंभीर आरोप केला. यावर प्रभारी परिवहन सभापती राजेंद्र महाडिक यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी तसेच प्रत्यक्षात जाऊन याची पाहणी करून त्यात दोषी आढळणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, असे आदेश दिले.जास्त कामगार कसे?सदस्य दशरथ यादव आणि प्रकाश पायरे यांनी संबंधित ठेकेदाराशी ४०० कामगार घेण्याचा करार केला असताना तो ९०० कामगार कसे घेतो, असा सवाल केला. त्यावर, आपण केवळ ४०० कामगारांचे वेतन अदा करतो, असे उत्तर प्रशासनाने दिले.

टॅग्स :tmcठाणे महापालिकाCorruptionभ्रष्टाचार