शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
3
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
4
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
5
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
6
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
7
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
8
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
9
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
10
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
11
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
12
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
13
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
14
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
15
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
16
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
17
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
18
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
19
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
20
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 

३५० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 4:43 AM

कल्याणमधील लक्ष्मी भाजी मार्केटमध्ये कारवाई : ५० हजार रुपयांचा दंड वसूल

कल्याण : प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीवर राज्य सरकारने मार्च २०१८ पासून बंदी घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर केडीएमसीची कारवाई थंडावल्याने काही ठिकाणी लपूनछपून, तर काही ठिकाणी सर्रास प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर केला जात आहे. ही बाब लक्षात घेता सोमवारी प्लास्टिक पिशव्यांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. यावेळी ३५० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. तसेच ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

लक्ष्मी भाजी मार्केटमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील, उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुले, केडीएमसीच्या आरोग्य विभागाचे अधिकारी विलास जोशी यांनी पोलीस बंदोस्तात प्लास्टिक पिशव्यांचा शोध घेतला. यावेळी अनेक भाजीविक्रेत्यांनी भाजीच्या टोपल्यांखाली प्लास्टिकच्या पिशव्या लपवल्याचे आढळले. या पिशव्या जप्त करून त्यांच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला. यावेळी काही फेरीवाल्यांनी तडजोडीची विनंती केली. प्लास्टिक पिशव्या सर्रास विकल्या जातात. मग, आमच्यावरच कारवाई का, असा सवाल काहींनी केला. मात्र, कारवाई पथकाने त्यांना दाद दिली नाही. अनेक विक्रेत्यांनी पथकासोबत अरेरावीची भाषा केली असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.थंडावलेली कारवाई पुन्हा सुरू झाल्याने भाजी मार्केटमधील व्यापारीवर्गात व विक्रेत्यांमध्ये धावपळ उडाली. कारवाईची खबर मार्केटमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे अन्य विक्रेते सावध झाले. कारवाई पथकाने त्यांचा मोर्चा कपडेविक्रेत्यांच्या दुकानांकडे वळवला. अनेक व्यापारी दुकानात प्लास्टिक पिशव्या विकत असल्याचे दिसून आले.व्यापाºयांनी दुधी भोपळा प्लास्टिक पिशवीत ठेवला होता. त्याचबरोबर १५ ते २० किलो वांगी, कारली, भेंडी, काकडी या भाज्यांच्या प्लास्टिक बॅगा आढळून आल्या. त्यालाही कारवाई पथकाने हरकत घेतली आहे. हे पॅकिंग शेतकºयांकडून आल्याचे सांगण्यात आले.नॉन व्हीविंग बॅगही जप्तच्काही दुकानदारांनी भाजीच्या पाटीखाली प्लास्टिक पिशव्या ठेवल्या होत्या. समोर दर्शनी भागात नॉन व्हीविंग बॅगा टांगून ठेवल्या होत्या. या बॅगाही पथकाने जप्त केल्या. त्या प्लास्टिकच्या नाहीत, मग त्या का जप्त करता, असा संतप्त सवाल व्यापारी व विक्रेत्यांनी केला.च्मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील यांनी सांगितले की, नॉन व्हीविंग बॅगांच्या उत्पादनात थर्माकोलचा वापर केला आहे. थर्माकोलच्या वापरावर बंदी आहे. त्यामुळे कापडी पिशव्या व कागदी पिशव्यांशिवाय कोणत्याही प्रकारच्या पिशव्यांचा वापर करता येणार नाही. कापडी व कागदी पिशव्यांचा वापर नागरिक व व्यापाºयांनी करावा.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका