राजन विचारेंचा ३५ वर्षांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:03 PM2019-05-24T23:03:27+5:302019-05-24T23:03:53+5:30

कामगार ते खासदार : सेनेचा ठाण्यातील गड राखण्यात यशस्वी

35 years of Rajan thoughts | राजन विचारेंचा ३५ वर्षांचा प्रवास

राजन विचारेंचा ३५ वर्षांचा प्रवास

Next

- अजित मांडके 

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा शिवसेनेचे राजन विचारे यांनी विजय संपादित केला आहे. त्यामुळे शिवसेनेला आपला ठाण्याचा पारंपरिक गड राखण्यात यश आले आहे.

विचारे यांचा आजवरचा राजकारणाचा ३५ वर्षांचा प्रवास झाला आहे. खासगी नोकरीत काम करणारे कामगार ते बांधकाम व्यावसायिक असा प्रवास करत असताना एक निष्ठावान शिवसैनिकापासूनत्यांनी शाखाप्रमुख ते खासदार असा पल्ला गाठला आहे.
त्यांचे शिक्षण अकरावीपर्यंत झाले आहे. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. त्यामुळे ते शिक्षण झाल्यावर खासगी कंपनीत कामाला लागले. याच काळात त्यांची शिवसेनेशी नाळ जोडली गेली. त्यांना तसा वडिलांचा वारसासुद्धा लाभला असल्याने ते शिवसैनिक म्हणून सक्रिय झाले. मधल्या काळात नोकरी सोडून त्यांनी बांधकाम व्यवसायात आपले नशीब आजमावण्यास सुरुवात केली. तसेच शिवसैनिक म्हणूनही ते स्वर्गीय आनंद दिघे यांच्यासोबत काम करू लागले. त्यानंतर, शाखाप्रमुखपासून त्यांचा हा राजकीय प्रवास खºया अर्थाने
सुरूझाला. वयाच्या तेविसाव्या वर्षी ते प्रथमच नगरसेवक झाले. त्यानंतर, सलग चार वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांच्या या कारकिर्दीत सभागृह नेतेपद, स्थायी समिती सभापतीपद आणि महापौरपदही त्यांनी भूषवले होते.

ठाणे शहराचा विकास आराखडा मंजूर होत असताना त्या कमिटीवरही ते प्रमुख म्हणून विराजमान होते. त्यानंतर, २००० साली त्यांना आमदारकीची संधी पक्षाने दिली. या आमदारकीच्या निवडणुकीतही त्यांनी बाजी मारली आणि पक्षाचा विश्वास सार्थकी ठरवला. त्यानंतर, पुन्हा त्यांच्यावर पक्षाने विश्वास टाकला आणि २०१४ मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाची खासदारकीची उमेदवारी दिली.

निर्विवाद वर्चस्व
पहिल्याच निवडणुकीत विचारे यांना दोन लाख ८२ हजारांचे निर्विवाद वर्चस्व संपादित करून खासदार होण्याचा मान मिळवला. त्यानंतर, २०१९ मध्ये पुन्हा त्यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार होण्याचा मान मिळवला आहे.

Web Title: 35 years of Rajan thoughts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.