शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

३,४९७ मुलांना आरटीई प्रवेश नाकारले; ठाणे जिल्ह्यातील ५,६७७ बालकांनी घेतला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 00:08 IST

शिक्षण विभागाची माहिती; बालकांच्या घराजवळ असलेल्या ६६९ शाळांमध्ये यंदा आरटीई कायद्याखाली २५ टक्के प्रवेश दिले आहेत.

सुरेश लोखंडे

ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली दुर्बल घटक आणि मागासवर्गीय परिवारातील बालकांचे त्यांच्या घराजवळच्या दर्जेदार शिक्षण देणाऱ्या  शाळेत २५ टक्के शालेय प्रवेश मोफत दिले जात आहे. यानुसार, जिल्ह्यातील नऊ हजार ३२६ विद्यार्थ्यांची लॉटरी सोडतद्वारे निवड झाली आहे. यापैकी पाच हजार ६७७ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून १५२ विद्यार्थ्यांना विविध कारणांखाली प्रवेश नाकारले आहेत. तर, उर्वरित तब्बल तीन हजार ४९४ बालकांच्या प्रवेशासाठी आईवडील संबंधित शाळेत गेले नाही. त्यामुळे त्यांनी शालेय प्रवेश नाकारल्याचे उघड झाले आहे.

बालकांच्या घराजवळ असलेल्या ६६९ शाळांमध्ये यंदा आरटीई कायद्याखाली २५ टक्के प्रवेश दिले आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पहिली ते सीनिअर केजी या वर्गात प्रवेश दिले जात आहेत. या प्रक्रियेनंतर आता प्रतीक्षा यादीतील एक हजार ८९४ विद्यार्थ्यांची या प्रवेशासाठी निवड झाली आहे. मात्र, यातील फक्त १३४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. उर्वरित तब्बल एक हजार ७५८ विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालक अद्यापही शाळेत गेलेले नाहीत. तर, उर्वरित विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पण,  संचारबंदीमुळे प्रवेश रखडले होते. यामुळे त्यांच्या निवड प्रक्रियेची वाट न बघता पालकांनी या शाळांमध्ये प्रवेश घेतले. मात्र, या कायद्याखाली प्रवेश घेण्याच्या तयारीत असलेल्या पालकांना विविध समस्यांमुळे, बहुतांश शाळांकडून मार्गदर्शन व सहकार्य न झाल्यामुळे या गरीब विद्यार्थ्यांना या मोफत शालेय प्रवेशाला मुकावे लागले आहे.

मार्गदर्शनाअभावी पालक गोंधळले

आजपर्यंत केवळ १३४ बालकांचे प्रवेश मिळाल्याचे दिसून येत आले. तर, दोन विद्यार्थ्यांचे प्रवेश विविध समस्यांमुळे रद्द झाले आहेत. उर्वरित निवड झालेल्या तब्बल एक हजार ७९२ विद्यार्थ्यांचे पालक मार्गदर्शनाअभावी गोंधळलेले आहेत. त्यामुळे या बालकांचे शालेय प्रवेश रखडल्याचे उघड झाले आहे. यासाठी जूनमध्ये लॉटरी सोडतद्वारे निवड झालेली आहे. प्रवेशाची शाळा प्रशासनाने एसएमएसद्वारे पालकांना कळवली आहे.

कोरोना संचारबंदीसह शाळांमधील कर्मचाऱ्याची कमतरता, प्रवेशासाठी होणाऱ्या गर्दीमुळे सामाजिक अंतर पाळले जात नसल्याच्या कारणाखाली ही प्रवेश प्रक्रिया रखडली. या समस्यांना तोंड दिल्यानंतर असहाय झालेल्या पालकांनी या विद्यार्थ्यांचे प्रवेश आधीच दुसऱ्या शाळेत घेतलेले आहेत. तेथील प्रवेश रद्द करून आरटीईखाली मोफत प्रवेश मिळणाऱ्या शाळेत प्रवेश आता घ्यावा किंवा नाही, ही द्विधा स्थिती पालकांची झाली आहे. याशिवाय मार्गदर्शनाच्या अभावामुळे पालकवर्ग गोंधळलेला आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा