शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

लॉकडाऊनमध्ये १८ दिवसात ३३६ घरांची नोंदणी, १४ कोटींचा महसुल गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 15:31 IST

लॉकडाऊन नंतर शिथील झालेल्या नियमांमुळे ठाणे जिल्ह्यातील उपनिंबधक कार्यालये देखील सुरु झाली आणि त्यानुसार १८ दिवसात या कार्यालयाअंतर्गत ३३६ नव्या घरांची नोंदणी झाली आहे. तसेच या पोटी सुमारे १४ कोटींचा महसुल गोळा झाला आहे.

ठाणे : कोरोनामुळे सर्व अर्थव्यवस्था कोलमडून पडली असतांना घर खरेदी विक्रीवर देखील याचा परिणाम झाल्याचे दिसून आले होते. परंतु मागील १८ दिवसात तब्बल ३३६ नव्या घरांची नोंदणी झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या या टाळेबंदीच्या काळात ठाणे जिल्हा नोंदणी कार्यालयाअंतर्गत १८ दिवसात १४ कोटींच्या आसपास महसुल गोळा झाला आहे.            कोरोनामुळे मार्च २१ पासून टाळेबंदी लागू झाली होती. त्याचा परिणाम संपूर्ण देशात दिसून आला. प्रत्येक घटकाला याचे परिणाम भोगावे लागले आहेत. यातून बांधकाम व्यावसायिकही सुटु शकलेला नाही. इमारती तयार असतांनाही बुकींग नसल्याने बांधकाम व्यावसायिक देखील संकटात आले होते. परंतु आता कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये थोडी थोडी शिथिलता आल्याने बांधकाम व्यावसायिकांना देखील थोडेसे हायसे वाटले आहे. मुंबई शहराच्या वेशीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आदी कमी दारात व निसर्गाच्या सानिध्यात घरे उपलब्ध होत आहे. तसेच ही घरे ग्राहकांच्या पसंतीस देखील उतरत आहेत. यामुळे या शहरांमध्ये घरे घेण्यासाठी नागरिकांच्या ओढा वाढत आहे. त्यामुळे नव्या घरांच्या गुंतवणूकीसाठी अनेकजण ठाणे जिल्ह्याला अधिक पसंती देत आहेत. मार्च महिन्याच्या सुरु वातीला काही जणांनी नवीन घरांच्या खरेदी केली होती. मात्र, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाच्या पाशर््वभूमीवर संपूर्ण देशभरात टाळेबंदी करण्यात आली. यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्याचा परिणाम घरांच्या नोंदणी प्रक्रि येवर देखील झाला होता. कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे एप्रिल महिन्यात एकही नोंदणी करण्यात आली नाही. तर मे महिन्याच्या १३ तारखेला जिल्हा दुय्यम निबंधक कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील १७ कार्यालयांपैकी ठाणे, कल्याण, मीरा-भार्इंदर आणि कोकणभवन ही चार कार्यालये प्रायोगिक तत्वावर सुरु केली. यावेळी १३ मे ते १६ मे या तीन दिवसाच्या कालावधीत या कार्यालयांमध्ये १६८ नवीन घरांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये ठाणे महापालिका हद्दीतील ११४, नवी मुंबई हद्दीत १८, मीरा-भार्इंदर २२ आणि कल्याण तालुक्यातील ५ घरांच्या नोंदणीचा समावेश आहे. त्यांनतर १६ मे पासून जिल्ह्यातील ठाणे तालुका हद्दीतील १२ आणि कल्याण तालुक्यातील ५ अशी एकुण १७ नोंदणी कार्यालये सुरु करण्यात आली. त्यामुळे १३ मे ते ३१ मे या १८ दिवसांच्या कालावधीत एकुण ३३६ नव्या घरांची नोंदणी झाली असून त्या माध्यमातून जिल्हा नोंदणी कार्यालयाला १३ कोटी ८१ लाखांचा महसूल मिळाला असल्याची माहिती सहजिल्हा निबंधक (वर्ग -२) ठाणे शहर तानाजी गंगावणे यांनी दिली. दरम्यान, कोरोनाच्या पाशर््वभूमीवर घरांच्या नोंदणीसाठी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडून सोशल डीस्टंगसीचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले असून नोंदणीसाठी लागणारे हाताचे ठसे घेण्यात येणाºया मशीनचे निर्जंतुकीकरणही केले जात आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या