शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे उत्पादन शुल्क विभागाने राज्य शासनाच्या तिजोरीत दिले ३३० कोटी २८ लाख

By अजित मांडके | Updated: April 23, 2024 14:46 IST

विभागाच्या ठाणे जिल्ह्यातून दारू व्यवसायातील करापोटी येणारा महसूल कसा वाढेल याकडे विशेष लक्ष घालून,  गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षात चार कोटींचा अधिक महसूल मिळाला आहे.

ठाणे : अवैध दारू व्यवसाय रोखण्यासाठी करडी नजर ठेवल्यामुळे ठाणे उत्पादन शुल्क विभागाने राज्य शासनाच्या तिजोरीत भरीव उत्पन्न टाकले आहे. विभागाच्या ठाणे जिल्ह्यातून दारू व्यवसायातील करापोटी येणारा महसूल कसा वाढेल याकडे विशेष लक्ष घालून,  गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षात चार कोटींचा अधिक महसूल मिळाला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात सुमारे ३३० कोटी २८ लाख रुपयांचा शासनाकडे जमा केले आहेत आहे.

राज्य शासनाच्या प्रमुख आर्थिक स्रोता पैकी एक असणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभाग महसूल वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. राज्य सरकारचा महसुल कसा वाढेल या दृष्टीने उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली असून, अतिशय कमी मनुष्यबळात विभागाचे प्रत्येक कार्यालयाने भरीव कामगिरी आहे. यामध्ये ठाणे विभागाने आर्थिक वर्षात सुमारे ३३०.३० कोटी रुपये जमा केले असल्याची माहिती विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी दिली.

गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) ३२६ कोटी रुपये जमा केले होते. या आर्थिक वर्षात चार कोटी रुपयांचा महसूल अधिक जमा झाला आहे. दारूची दुकाने, बार अँड रेस्टॉरंट यांचा परवाना नूतनीकरण, बाहेरून राज्यात येणाऱ्या मद्यावरील शुल्क (आयात शुल्क), परवाना दुसऱ्या जागी स्थलांतर करणे (विशेष अधिकार शुल्क ) अशा विविध मार्गांनी विभागाकडे महसूल जमा होत असून, या वर्षात ३३o कोटी २८ लाखांचा  महसूल जमा झाला आहे.

अवैध दारू विक्रीवर कारवाई करत असल्यामुळे छुप्या पद्धतीने दारू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे  सरळ मार्गी दारू विक्री करण्याचे प्रमाण वाढत आहे. या सर्वाचा फायदा विभागाला महसूल वाढीसाठी होताना दिसतो. मार्च महिन्यात विभागीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम केले होते. याचा परिणाम गेल्या वर्षी पेक्षा यंदा करापोटी अधिक पैसे शासन तिजोरीत जमा झाले.- डॉ. निलेश सांगडे (राज्य उत्पादन शुल्क ठाणे जिल्हा अधीक्षक)

टॅग्स :thaneठाणे