शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

३०५ हॉटेलच्या एनओसी तयार, मालकांचा मात्र पत्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 06:55 IST

ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रासाला कंटाळून मंगळवारपासून शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी पुकारलेला बंद बुधवारी आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आला. आयुक्तांनी अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह टॅक्स कमी करून सील केलेले हॉटेल तत्काळ खुले करण्याचे आदेश दिले होते.

ठाणे - ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रासाला कंटाळून मंगळवारपासून शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी पुकारलेला बंद बुधवारी आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आला. आयुक्तांनी अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह टॅक्स कमी करून सील केलेले हॉटेल तत्काळ खुले करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, अग्निशमन विभागाने अवघ्या काही तासांतच शहरातील ५०० पैकी शिल्लक ३०५ हॉटेलच्या एनओसीदेखील तयार केल्या आहेत. परंतु, त्या ताब्यात घेण्यासाठी अद्यापही एकाही हॉटेलचालकाने अग्निशमन विभागाशी संपर्क साधलेला नाही. विशेष म्हणजे या एनओसीअभावी शहर विकास विभागाकडूनदेखील त्यांनी परवाने घेणे शिल्लक आहे. ३१ मार्चपर्यंतही कार्यवाही पूर्ण केली नाही, तर पुन्हा या हॉटेलवर कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे.अग्निशमन दलाचा ना-हरकत दाखला नसलेल्या ठाणे शहरातील एकूण ४२६ हॉटेल्स, बार, लाउंज यांना यापूर्वी अग्निशमन दलाच्या वतीने नोटिसा दिल्या होत्या. त्यापैकी जवळपास ८० आस्थापनांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्याने ती हॉटेल्स नियमित केली आहेत. परंतु, उर्वरित हॉटेलवाल्यांनी याची पूर्तता न केल्याने ते सील करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानंतर, तीन दिवसांत ३६ हॉटेल, बार सील करण्यात आले. परंतु, अग्निशमन दलाच्या जाचक अटी पॅनल्टी चार्जेस कमी करण्याच्या उद्देशाने शहरातील सुमारे ५०० हॉटेल, बारवाल्यांनी मंगळवारपासून बंदची हाक दिली होती. यासंदर्भात बुधवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी हॉटेल, बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर या चार्जेसचे स्लॅब करून ते २५ लाखांवरून थेट पाच लाखांपर्यंत खाली आणले आहेत. तसेच सील केलेले हॉटेल तत्काळ खुले करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार, अग्निशमन विभागाने आपली जबाबदारी पारदेखील पाडली.अग्निशमन विभागावर टीका करणाºया बार आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी याच विभागाने रात्री ११.३० वाजेपर्यंत शहरातील शिल्लक राहिलेल्या ३०५ हॉटेल, बारच्या एनओसी तयार केल्या आहेत.आंदोलकांना आता गरज नाही कागुरुवारी दिवसभरात एकही हॉटेल व्यावसायिक अग्निशमन विभागाकडे फिरकलाच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या विभागावर टीका करणाºया आणि आंदोलन करणाºया हॉटेल व्यावसायिकांना आता एनओसीची गरज नाही का, असा सवाल मात्र यानिमित्ताने शहरात तसेच पालिका वर्तुळात उपस्थित झाला आहे.शहर विकास विभागाचाही घ्यावा लागणार परवाना''अग्निशमन विभागाचे चार्जेस कमी केले असले, तरी शहर विकास विभागाचे कम्पोडिंग आणि चेंज आॅफ युजर्सचे चार्जेस मात्र कमी झालेले नाहीत. विशेष म्हणजे अग्निशमन विभागाची एनओसी घेतल्यानंतर या हॉटेल व्यावसायिकांना चेंज आॅफ युज करून घेऊन त्याची माहिती शहर विकास विभागाला सादर करायची आहे. यासाठी आता केवळ २२ दिवसांचा अवधी शिल्लक आहे.असे असताना अद्याप अग्निशमन विभागाकडूनच एनओसी न घेतल्याने शहर विकास विभागाची एनओसी केव्हा मिळणार हादेखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. ३१ मार्चपर्यंत जे हॉटेलचालक या प्रक्रिया पूर्ण करतील, तेच १ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहेत. परंतु, जे या प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांच्यावर मात्र कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे.

टॅग्स :tmcठाणे महापालिका