शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात रेल्वेतून वर्षभरात ३००२ मोबाइल चोरीला , केवळ १० टक्के गुन्हे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:50 IST

ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील वर्षभरात तब्बल ३,००२ मोबाइल फोन चोरीला गेले आहेत. ही आकडेवारी पाहता दररोज सरासरी ८ ते ९ मोबाइल फोन प्रवासादरम्यान चोरीला जात आहेत.

पंकज रोडेकरठाणे : ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील वर्षभरात तब्बल ३,००२ मोबाइल फोन चोरीला गेले आहेत. ही आकडेवारी पाहता दररोज सरासरी ८ ते ९ मोबाइल फोन प्रवासादरम्यान चोरीला जात आहेत. मोबाइल लांबवणारे मुख्यत्वे नशेखोर असून चोरलेल्या मोबाइलचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अवघे १० टक्के आहे. चोरीला जाणाºया मोबाइलची लोकेशन्स बहुतांश परराज्यात असल्याचे निदर्शनास आले आहे तर काही मोबाइलचे सुटे भाग विकले जात असल्याने गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ठाणे लोहमार्ग पोलिसांची हद्द कोपरी पुलापासून दिवा स्थानक ते दिव्यापासून निळजेपर्यंत आहे. ठाणे स्थानकातून दररोज ६ ते ७ लाख प्रवासी रेल्वेने ये-जा करतात. या गर्दीच्या लोकल प्रवासात मोबाईल फोन चोरीचे प्रकार वाढले आहेत. मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांची यापूर्वी मिसींगमध्ये नोंद केली जात होती. जून २०१७ पासून चोरीला जाणाºया मोबाइलबाबत थेट एफआयआर नोंदवण्यास सुरूवात झाली. मागील वर्षात ठाणे रेल्वे प्रवासात तब्बल ३००२ मोबाइल चोरी गेले. या मोबाइल्सची किंमत ही ४ लाख ९५ हजार ३८६ इतकी आहे. तसेच त्यापैकी २८९ गुन्हे उघडकीस आले असून हे प्रमाण अवघे १० टक्के असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.परराज्यात मोबाइल : रेल्वे प्रवासात चोरीला गेलेले मोबाइल प्रामुख्याने पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक, उत्तर व मध्य प्रदेश, बिहार यासारख्या परराज्यात पाठवले जातात. काही मोबाइलचे सुटे भाग करून त्याची विक्री केली जात असल्याचे तपासात पुढे आले आहे.चार्जिंग पॉईंटही झाले बंदरेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन येथे मोबाइल चार्जिंग पाईंट करण्यात आले होते. येथे मोबाइल चार्जिंगला लाऊन लोक जात होते. त्यातून काही मोबाईल चोरीला जाऊ लागले. याचा नाहक त्रास प्रशासनाला होऊ लागल्याने प्रशासनाने ते चार्जिंग पाईंटच बंद केले.मागील २०१७ या वर्षात जवळपास ३ हजारांहून अधिक मोबाइल चोरीला गेले आहेत. मोबाइल चोरीचे प्रकार उघडकीस येण्याचे प्रमाण १० टक्के आहे. या वाढत्या घटना लक्षात घेऊन स्थानक परिसर आणि लोकलमध्ये पेट्रोलिंग वाढवले आहे. नशाबाजी करण्यासाठी चोरटे मोबाईल लांबवत असल्याचे तपासात उघड झाले आहे. - उत्तम सोनावणे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोहमार्ग ठाणे.

टॅग्स :thaneठाणे