शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

३०० घड्याळे चोरली, ‘कालू’ ला अखेर बेड्या; सीसीटीव्हीमुळे लागला शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 09:10 IST

नगरातील रहिवासी  रितेश आडिया (वय ४८) यांच्या घड्याळाच्या गोदामात विक्रीसाठी ३०० पेक्षा अधिक मनगटी घड्याळे त्यांनी ठेवली होती.

ठाणे : कळव्यातील मनीषानगर भागातील दुकानाच्या गोदामातून सुमारे ३०० घड्याळांची चोरी करणाऱ्या  सरूद्दीन ऊर्फ कालू ताजुद्दीन शेख (३२, रा. संजय नगर, मुंब्रा, ठाणे) या सराईत चोरट्याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांनी रविवारी दिली. त्याच्याकडून १६९ घड्याळे हस्तगत करण्यात आली आहेत.

कळव्यातील मनीषा

नगरातील रहिवासी  रितेश आडिया (वय ४८) यांच्या घड्याळाच्या गोदामात विक्रीसाठी ३०० पेक्षा अधिक मनगटी घड्याळे त्यांनी ठेवली होती.  या गोदामाच्या दरवाजाला लावलेले कुलूप कटावणीच्या  साहाय्याने तोडून चोरट्यानी गोदामात शिरकाव करून सुमारे ३०० घड्याळांची चोरी केल्याचा प्रकार ३ जुलै २४ रोजी पहाटे १:३० वाजता घडला होता.

याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ),३३१ (३),३३१ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शेख याने गोदामातून प्रत्येकी ३०० रुपये किमतीची ९० हजारांची ३०० घड्याळे चोरली होती. त्यापैकी ५० हजार ७०० रुपयांची १६९ घड्याळे हस्तगत केली आहेत.

चौकशीत दिली चोरीची कबुली

गुन्हा दाखल झाल्यानंतर कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस  निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे  पोलिस उपनिरीक्षक सागर सांगवे आणि त्यांच्या पथकातील पोलिस हवालदार शहाजी एडके,  रमेश पाटील, गणेश बांडे, श्रीमंत राठोड,  राहुल पवार,  अमोल ढावरे आणि अंमलदार प्रशांत लवटे आदींनी  गोदाम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करून काही खबऱ्यांच्या मदतीने आरोपीला मुंब्य्रातील संजयनगर भागातून  ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याविरोधात मिळालेल्या तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. सरुद्दीनविरुद्ध ठाणे आणि  मुंबई शहरातील विविध पोलिस ठाण्यांत चोरी तसेच घरफोडीच्या विविध कलमांखाली १३ गुन्हे दाखल आहेत.