बिर्लागेट : कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या रविवारी होणाऱ्या मतदानासाठी सुमारे ३००च्या वर पोलिसांचा फौजफाटा तैनात केला असून एक एसआरपी प्लॅटूनसह एक दंगा नियंत्रण पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. तसेच परिसरातून २५ लोकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही केल्याचे टिटवाळा ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांनी सांगितले.तालुक्यातील नागाव, दानबाव, म्हसकळ, घोटसई, आपटी -मांजर्ली, म्हारळ, निंबली, मोस, बेहरे, बापसई, कांबा, जांभूळ, मानिवली, वडवली, शिरढोण, राया-गोवेली, रायते, वपर, दहागाव, खोणी-वडवली, वाल्होळी अशा २३ ग्रामपंचायतींपैकी वाहोली ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला. तर दहागावच्या पोटनिवडणुकीकरिता एकही अर्ज न आल्याने २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. २१८ जागांसाठी ४४९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून सर्वाधिक मतदान केंद्र म्हारळमध्ये असून वरप, कांबा, रायते, मानिवली, घोटसई या गावात मतदान काळात कोठेही गैरप्रकार होऊ नये, लोकांना निर्भीडपणे मतदान करता यावे या करिता हा फौजफाटा तैनात केला आहे. १५ अधिकारी, १० ते १२ इतर अधिकारी, एक दंगा नियंत्रक पथक, एक एसआरपी तुकडी, तैनात केली असून आतापर्यंत २५ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकाप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणुकांना ही एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे.‘‘आमच्या वतीने आम्ही चोख बंदोबस्त केला आहे. लोकांनीही बिनधास्तपणे मतदान करावे.’’- व्यंकट आंधळे, पोलीस निरीक्षक टिटवाळा
एकवीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी ३०० पोलीस
By admin | Updated: November 1, 2015 00:12 IST