शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र दहीहंडी समितीत फूट; ३०० गोविंदा पथके पडली बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 12:30 IST

ठाणे शहर हे दहीहंडी नगरी म्हणून ओळखले जाते, असे असतानाही दहीहंडी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्याने ठाणे शहरातील एकाही गोविंदा पथकाला बोलावले नसल्याची नाराजी ठाणे समन्वय समितीने व्यक्त केली

- प्रज्ञा म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुख्यमंत्री यांच्यासोबत सोमवारी झालेल्या गोविंदा पथकांच्या बैठकीत ठाण्यातील एकाही गोविंदा पथकाला बोलावले नसल्याने ठाणे शहरासह जिल्ह्यातील ३०० गोविंदा पथकांनी दहीहंडी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य या मुख्य समितीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हे नाराज गोविंदा लवकरच एक बैठक घेऊन नव्या समन्वय समितीची स्थापना करणार आहेत.

ठाणे शहर हे दहीहंडी नगरी म्हणून ओळखले जाते, असे असतानाही दहीहंडी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्याने ठाणे शहरातील एकाही गोविंदा पथकाला बोलावले नसल्याची नाराजी ठाणे समन्वय समितीने व्यक्त केली, तसेच या बैठकीची कल्पनाही दिली नसल्याचे महाराष्ट्र समन्वय समितीचे उपाध्यक्ष समीर पेंढारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. महाराष्ट्र समन्वय समितीशी ठाणे जिल्हा समन्वय समिती संलग्न आहे. छोटे-मोठी मंडळे मिळून ३०० हून अधिक मंडळे ठाणे जिल्हा समन्वय समितीशी जोडली गेली आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल तेव्हा ठाणे शहराच्यावतीने एका गोविंदा पथकाच्या किमान एका पदाधिकाऱ्याला तरी मुख्य समितीकडून निमंत्रित केले जाईल, अशी ठाणे शहरातील गोविंदा पथकांची आशा होती. मात्र, ही आशा त्यांची फोल ठरली. मुंबईतील सात ते आठ पदाधिकारीच उपस्थित होते. त्यात एखादा ठाण्याचा पदाधिकारी घेऊ शकत होते, असे गोविंदा पथकांनी सांगितले. त्यामुळे मुख्य समन्वय समिती आणि ठाणे जिल्हा समन्वय समितीमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. नाराज झालेले गोविंदा पथक लवकरच नवीन समन्वय समितीची स्थापना करणार आहेत. मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांतून जे गोविंदा सोबत येतील त्यांना या समितीत घेतले जाईल. तसेच, लवकरच रूपरेषा ठरविली जाईल, असे ठाण्यातील गोविंदा पथकांनी सांगितले. 

गोविंदा पथकांच्या बाजूने या बैठकीत कोणती भूमिका मांडली, याची कल्पना ठाणे शहरातील गोविंदा पथकांना नाही. ठाण्यातील गोविंदा पथकांना विश्वासात न घेता ही बैठक झाल्याने मुख्य समितीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य समितीवर ठाण्यातील दोन पदाधिकारी असतानादेखील निमंत्रित केले नाही. - समीर पेंढारे, उपाध्यक्ष,दहीहंडी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

आम्ही वेगळी समिती स्थापन करणार आहोत. मुख्य समिती आम्हाला विश्वासात घेत नाही म्हणून आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.          - नीलेश वैती, जतन गोविंदा उत्सव मंडळ

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत ठाण्यातून एकाला सहभागी केले नाही. येथेदेखील समन्वय समितीचे पदाधिकारी असून, एकाला तरी निमंत्रित करायला हवे होते. - सचिन खारकर, सहयोग गोविंदा पथक

टॅग्स :Dahi Handiदहीहंडीthaneठाणे