शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

‘अपना घर’ योजनेतील ३० मजले बेकायदा, पालिकेचे कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:40 IST

बेकायदा कामांना पाठीशी घालणाऱ्या महापालिकेला विधिमंडळ अधिवेशनात आमदारांनी अपना घर योजनेतील बेकायदा बांधकामांचा मुद्दा उचलून दणका दिला आहे.

मीरा रोड : भाजपचे मीरा-भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित बेकायदा कामांना पाठीशी घालणाऱ्या महापालिकेला विधिमंडळ अधिवेशनात आमदारांनी अपना घर योजनेतील बेकायदा बांधकामांचा मुद्दा उचलून दणका दिला आहे. पालिकेच्या नगररचना विभागाने प्रभाग अधिकाºयास लेखी पत्र देऊन अपना घर योजनेतील वाढीव बेकायदा बांधकामांची यादी देऊ न तोडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. १० इमारतींमध्ये तब्बल ३० बेकायदा वाढीव मजल्यांचे बांधकाम झाले आहे. प्रभाग अधिकारी मात्र कारवाईस टाळाटाळ करत आहे.७११ कन्स्ट्रक्शन कंपनीची हाटकेश भागात ‘अपना घर’ ही निवासी संकुल वसाहतीची योजना आहे. अपना घर ‘ए’ व ‘बी’साठी फेब्रुवारी २०१७ मध्ये आयुक्त रजेवर असताना नगररचना विभागाने बांधकाम परवानगी दिली होती. तर ‘ए’ इमारत प्रकल्पास २०१८ मध्ये सुधारित परवानगी दिली गेली.नंतर या दोन्ही इमारत प्रकल्पांसाठी सुधारित परवानगी मागण्याचा प्रस्ताव आला असता महापालिकेने तो ना-मंजूर केला होता. या जागेवर वाढीव तसेच नियमबाह्य बांधकाम होऊनही नगररचना विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यासह अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला होता.बेकायदा वाढीव बांधकामप्रकरणी विधिमंडळ अधिवेशनात आमदारांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर नगररचना विभागाचे सहायक संचालक मिलिंद आवडे यांनी, या वाढीव बांधकामांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, असे प्रभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण यांना २५ फेब्रुवारीला पत्राद्वारे कळवले होते. सोबत त्यांनी वाढीव बेकायदा बांधकामांचा नकाशा व यादी जोडली होती. त्यामुळे आमदारांनी बेकायदा बांधकांमंचा मुद्दा उचलून चांगलाच दणका दिला आहे.>११ हजार ७०० चौ.मी. बांधकाम बेकायदाअपना घर योजनेच्या ए व बी मध्ये १० इमारतींमध्ये तळ अधिक भाग : २ मजल्यापासून स्टील्ट अधिक नऊ मजल्यांपर्यंतची परवानगी दिली आहे. पण कंपनीने ६ ते १४ मजल्यांपर्यंतच्या इमारतींची बांधकामे केली आहेत. त्यानुसार ३० मजले वाढीव असून तब्बल ११ हजार ७०० चौ.मीटर इतके बांधकाम बेकायदा ठरले आहे.