शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

भिवंडीतील १६ शाळांच्या इमारत नूतनीकरणासाठी ३० कोटींचा निधी, रईस शेख यांच्या प्रयत्नांना यश

By नितीन पंडित | Updated: November 19, 2022 13:19 IST

महापालिकेच्या १६ शाळांच्या इमारतींचे नूतनीकरण व सुसज्ज करण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी दिली आहे.

भिवंडी :  भिवंडीतील महापालिका शाळांचे रुपडे लवकरच बदलणार असून त्यासाठी सपाचे आमदार रईस शेख यांनी राज्य सरकारकडून ३० कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे. त्याद्वारे महापालिकेच्या १६ शाळांच्या इमारतींचे नूतनीकरण व सुसज्ज करण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी दिली आहे.

शेख यांनी २२ जुलै २०२२ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भिवंडी मनपाच्या शाळांच्या दुरावस्थेची व्यथा मांडत सदर शाळा इमारती जीर्ण झाल्याने दुरुस्ती व नूतनीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचा मुद्दा अधोरेखित केला होता.त्यानुसार शहरातील १६ शाळांची दुरुस्ती आता होणार आहे. ज्यात शांतीनगर पोलीस चौकी मनपा शाळा क्र.९२,९९ व १०० च्या आधुनिकीकरणासाठी ५ कोटी,मनपा शाळा क्र.३४ व ८४ मधील वाचनालय इमारतीचे नूतनीकरण, पेव्हर ब्लॉक, शाळेच्या आवारात सुरक्षा भिंत, उद्यान व मुख्य गेट बांधकामासाठी ४ कोटी रुपये, तसेच बाळा कंपाऊंडमधील शाळा क्र.८६ च्या नूतनीकरणासाठी ३ कोटी रुपये,नवी वस्ती परिसरातील शाळा क्र.६८ च्या नूतनीकरणासाठी १.२५ कोटी रुपये, गैबी नगर शाळा क्र. ६२ व २२ च्या नूतनीकरणासाठी ५ कोटी, नवी वस्ती गौतम कंपाऊंड समोरील शाळा क्र. ५७,९५ च्या नूतनीकरणासाठी १.७५ कोटी, चिश्तिया मशिदीजवळील शाळा क्र.१७ नूतनीकरणासाठी १ कोटी, शाळा क्र.८१ सब्जी मार्केट शांतीनगरच्या नूतनीकरणासाठी १ कोटी,संजय नगर शाळा क्र.१०३ च्या नूतनीकरणासाठी १ कोटी, गुलजार नगरच्या मनपा शाळा क्र.७० च्या नूतनीकरणासाठी २ कोटी रुपये, रावजी नगर मनपा शाळा क्र.५४,७३ गणेश नगर,कामतघर मनपा शाळा नूतनीकरणासाठी दीड कोटी रुपये  शाळा क्र.४१ च्या नूतनीकरणासाठी १ कोटी आणि नवी वस्ती शाळा क्र.८७ च्या नूतनीकरणासाठी १ कोटी ५० लाख रुपये अशा प्रकारे एकूण ३० कोटी रुपये मंजूर करण्याची विनंती शेख यांनी शासनाकडे होती.

आमदार रईस शेख यांच्या या विनंतीचा गांभीर्याने विचार करून ३० कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर केला आहे. ठाणे जिल्हा नियोजन समितीचे जिल्हा नियोजन विभागाच्या वतीने आमदार रईस शेख यांना त्यासंदर्भात लेखी पत्र देखील पाठवले असलंयाची माहिती आमदार शेख यांनी दिली आहे.तसेच महापालिकेच्या शाळांचे मूल्यांकन तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने भिवंडी महापालिकेला पत्र देखील दिले असून जिल्हा नियोजन समितीने भिवंडी नगरपालिकेला पत्र लिहून पालिकेच्या शाळांचे मूल्यांकन लवकरात लवकर तयार करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे भिवंडी पालिकेच्या शाळांच्या इमारतींचे लवकरच रुपडे पलटणार आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी