शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

संशोधन लाभापासून जिल्ह्याची ३१ गावे वंचित; देशातील ५८ जिल्ह्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:22 IST

विद्यार्थ्यांच्या प्रयोगांचा होणार फायदा

सुरेश लोखंडेठाणे : देशातील विविध अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन यांच्यामध्ये संशोधन व नावीन्यपूर्ण प्रयोग सतत सुरू आहेत. या संशोधनाचा लाभ ठाणे जिल्ह्यातील ३१ गावांना देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी त्यांची निवड झालेली आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षित व निष्काळजीपणामुळे या गावखेड्यांना अद्यापही या तांत्रिक लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

केंद्र शासनाने उन्नत भारत अभियानाची आखणी केली आहे. याद्वारे देशातील विविध अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन यांच्यामध्ये विद्यार्थ्यांनी संशोधन व नावीन्यपूर्ण प्रयोग करून विविध स्वरूपांचे तांत्रिक शोध लावले आहेत. या तंत्रज्ञानाचा लाभ देशातील गावखेड्यांना देणार आहे. यासाठी देशातील ५८ जिल्ह्यांची निवड केली आहे. यामध्ये राज्यातील १३ जिल्हे असून त्यात ठाणे जिल्ह्याचाही समावेश आहे. एवढेच नव्हे तर या तंत्रज्ञानाचा लाभ देण्यासाठी मुरबाड व कल्याण तालुक्यातील ३१ गावांची निवडही जिल्हा प्रशासनाने केली आहे. मात्र, या गावखेड्यांना अद्यापही साधनांचा लाभ झालेला नाही.या संशोधनाचा लाभअभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालयांचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी संशोधन करून तयार केलेली तांत्रिक साधने गावखेड्यांच्या वापरासाठी दिली जाणार आहे. यामध्ये विद्युतीकरण, पिण्याचे पाणी, ग्रामीण उद्योग, शहरी भागांतील विद्युतीकरण, सार्वजनिक वाहतूक, जलसंपदा, स्वच्छता, कुकिंग एनर्जी आदी तांत्रिक साधनांचा समावेश आहे. या संशोधनाचा लाभ त्या-त्या गावांच्या गरजेनुसार करून देण्याचे नियोजन केलेले आहे. यासाठी गेल्या दीड ते दोन वर्षांपूर्वी बैठक घेऊन जिल्ह्यातील ३१ गावांची निवड केली होती.कल्याण-मुरबाड तालुक्यांतील ही आहेत गावे : जिल्ह्यातील गावांची त्यांच्या गरजेनुसार निवडही केली आहे. यामध्ये मोरणी, चिंचवली, कुसापूर, गेरसे, काकडपाडा, दहागाव, पळसोली, पोई, आगाशी, सोहन अंतडे, अंबे टेंबे, चिरड, अस्कोत, बोरगाव, संगम, कासगाव, मढ, दहीगाव, डेहनोली, उमरी खुर्द, खाटेघर, कळमखंडे, मोहोप, कोंडेसाखरे, काचकोली, न्हाव्हे, तोंडली, पेंढारी, रामपूर, सिंगापूर, पळू आदी गावांचा निवडयादीत समावेश आहे. या गावखेड्यांमध्ये नियोजनानुसार निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.