शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

१४ गावांचा पुन्हा निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 01:05 IST

नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या कल्याण ग्रामीण विधानसभेतील १४ गावांनी पुन्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे.

कल्याण : नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या कल्याण ग्रामीण विधानसभेतील १४ गावांनी पुन्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. दहिसर येथे गुरुवारी झालेल्या सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मनसेचे स्थानिक आमदार प्रमोद (राजू) पाटील हे देखील उपस्थित होते. गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करावा, अशी तेथील ग्रामस्थांची मागणी आहे.ठाणे तालुक्यातील ही १४ गावे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात येतात. भौगोलिकदृष्ट्या ती नवी मुंबईजवळ आहेत. काही वर्षांपूर्वी ही गावे नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आली. त्यामुळे त्या गावांमध्ये ग्रामपंचायत अस्तित्वात आली. परंतु, विकास रखडल्याने ग्रामपंचायत नको. गावांचा महापालिकेत समाविष्ट करावा, अशी मागणी २०१५ पासून येथील ग्रामस्थांनी लावून धरली आहे.>आमदारांचाही पाठिंबानवी मुंबई महापालिकेची एप्रिलमध्ये निवडणुका होत आहेत. त्यासाठी प्रभागरचनाही जाहीर झालेली असून, या १४ गावांच्या वाकळण, नागाव, दहिसर, पिंपरी आणि नारिवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही जाहीर झाल्या आहेत. मात्र, यावेळीही निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपस्थित असलेले आमदार पाटील यांनीही बहिष्काराच्या निर्णयाला पाठिंबा दिला.