शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या रस्त्यांवर आणखी २० तेजस्विनी बस; महिला प्रवाशांची गैरसोय दूर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 00:18 IST

महिला वाहकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात

ठाणे : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या एक ते दोन दिवस आधी केवळ एकच तेजस्विनी बस ताफ्यात घेऊन तिचा लोकार्पण सोहळा सत्ताधारी शिवसेनेने उरकला होता. परंतु,आता येत्या दोन आवड्यात आणखी २० बस रस्त्यावर धावणार आहेत. शिवाय महिला वाहकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्यात आली असून त्यांच्यासाठी चेंजिग रूम, टॉयलेट आदींची व्यवस्था करण्यासाठी आनंदनगर डेपोत काम सुरू करण्यात येणार आहे. एकूणच आता मागील दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या बस खऱ्या अर्थाने रस्त्यावर धावणार आहेत.

शासनाकडून या बसच्या खरेदीसाठी ६ कोटींचे अनुदान यापूर्वीच मिळाले असून सर्व निविदा प्रक्रि यादेखील पूर्ण झाली आहे. महिलांच्या सुरिक्षततेच्या दृष्टीकोणातून राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि कल्याण-डोंबिवली या शहरांना एकूण ३०० तेजिस्वनी बस मिळणार आहेत. त्यापैकी ५० बस ठाणे शहराच्या वाट्याला आल्या आहेत. त्यानुसार विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या एक ते दोन दिवस आधी सत्ताधारी शिवसेनेने घाई गडबडीत एक बस दाखल करून घेऊन श्रेय लाटण्याचे काम केले होते.

आनंदनगर डेपोत महिला वाहकांसाठी सुविधाखास महिलांच्या सुरिक्षतेतच्या दृष्टिकोनातून या बसेसची रचना केली आहे. या बसमध्ये वाहनचालक जरी पुरुष असले तरी वाहक मात्र महिला असणार आहेत. त्यानुसार या वाहक महिलांची भरती प्रक्रिया अंतिम टप्यात आली आहे. त्यानुसार या महिलांसाठी आनंदनगर डेपोमध्ये चेंजिग रूम, टॉयलेट आदींसह इतर कोणत्या सुविधा देता येऊ शकतात, याची पाहणी गुरुवारी व्यवस्थापक संदीप माळवी यांच्यासह इतर सहाकाऱ्यांनी केली आहे. त्यानुसार लवकरच त्याचेही काम सुरू होणार आहे. ज्या मार्गांवर महिला प्रवाशांची संख्या जास्त आहे, त्या मार्गांवर या बस सोडल्या जाणार आहेत. सकाळी आणि सांयकाळच्या सुमारास या बसेसच्या अधिक फेºया होणार आहेत.

टॅग्स :tmcठाणे महापालिकाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका