शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

१०० सूर्यनमस्कार घालून टिळकांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 01:04 IST

९९ व्या पुण्यतिथीनिमित्त रिसबूड यांचा उपक्रम : आजोबांपासून चालत आली व्यायामाची परंपरा

डोंबिवली : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शताब्दी पुण्यस्मरण वर्षाला गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. लोकमान्य टिळक यांच्या ९९ व्या पुण्यतिथीनिमित्त डोंबिवलीचे शैलेंद्र रिसबूड यांनी सरदारगृह येथे १०० सूर्यनमस्कार घालून टिळक यांना आदरांजली वाहिली.टिळक यांनी मुंबईतील सरदारगृह येथे अखेरचा श्वास घेतला. त्याठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला. सरदारगृह येथे हा उपक्रम राबविण्यात यावा, अशी संकल्पना केसरीच्या ज्येष्ठ पत्रकार कल्पना खरे यांनी मांडली. त्यानुसार, रिसबूड यांनी हा उपक्रम राबवला. गुरुवारी सकाळी सरदारगृहात लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर रिसबूड यांनी सूर्यनमस्कार घालण्यास सुरुवात केली.

डोंबिवलीत शिवमंदिर रोडला ते राहतात. त्यांचे शालेय शिक्षण एस.के. पाटील विद्यालयात झाले. त्यानंतर ठाण्यातील बांदोडकर महाविद्यालयातून त्यांनी बीएस्सीची पदवी घेतली. काही काळ त्यांनी बँकेत नोकरी केली. २०१२ ला त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत आता घरूनच काम करतात. त्यांचे आजोबा आणि वडील हेदेखील सूर्यनमस्कार घालत होते. त्यामुळे रिसबूड यांना महाविद्यालयीन जीवनापासूनच सूर्यनमस्काराची गोडी लागली होती. रिसबूड यांचे आजोळ हे रत्नागिरीजवळील खेड या गावाजवळ होते. त्यांचे आजोबा शंकर बर्वे हे व्यवसायाने वकील होते. ते खेड नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष होते. त्याकाळात टिळक त्यांच्या घरी आले होते. त्यांचा छोटासा चहापानाचा कार्यक्रमही झाला होता. तेव्हापासून त्यांचे आणि टिळक यांचे ऋणानुबंध जोडले गेले, ते आजतागायत कायम आहेत. त्यामुळेच आपण टिळकांना आदरांजली वाहत असल्याचे रिसबूड यांनी सांगितले.

लोकमान्य टिळक स्वत: महाविद्यालयीन जीवनात व्यायाम करीत असत. त्यामुळे त्यांना व्यायामातून आदरांजली वाहण्याचा विचार केला. सूर्यनमस्कार हा व्यायामाचा प्रकार करण्यासाठी कमी जागा लागते. साधने अधिक लागत नाही. त्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. या उद्देशाने सूर्यनमस्कार घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे रिसबूड म्हणाले. टिळकांनी मुंबईत केशवजी नाईकांच्या चाळीत मुंबईतील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. या घटनेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रिसबूड यांनी लोकमान्यांना दीड हजार सूर्यनमस्कारांची मानवंदना दिली होती. २५ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर या गणेशोत्सव कालावधीत दररोज १२५ सूर्यनमस्कार त्यांनी घातले होते. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या लोकमान्यांच्या सिंहगर्जनेला १०० वर्षे पूर्ण झाली, त्यावेळीही रिसबूड यांनी ३०० सूर्यनमस्कार घातले होते. एका दिवसात सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी १५० सूर्यनमस्कार त्यांनी घातले होते. याप्रमाणेच त्यांनी यापूर्वी १२ वेळा सूर्यनमस्कार घातले आहेत.

टॅग्स :Lokmanya Tilakलोकमान्य टिळकthaneठाणे