शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

29 मनोरुग्णांना मिळाली सुट्टी, जागृती संस्थेत पुनर्वसन; स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी पंखांना देणार बळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 14:05 IST

   ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने २९ मनोरुग्णांना जागृती पुनर्वसन केंद्रात त्यांची रवानगी केली आहे. अशा मनोरुग्णांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ दिले जाणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. नेताजी मुळीक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

ठाणे : नातेवाइकांनी नाकारलेल्या, नातेवाईक सापडत नसलेल्या, कुटुंब हयात नसलेल्या अशा मनोरुग्णांना आता मनोरुग्णालयातून कायमची सुटी मिळाली आहे. कुटुंबाने आधार दिला नसला तरी पुनर्वसन केंद्राचा मात्र त्यांना आधार मिळाला आहे.  

   ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने २९ मनोरुग्णांना जागृती पुनर्वसन केंद्रात त्यांची रवानगी केली आहे. अशा मनोरुग्णांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ दिले जाणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. नेताजी मुळीक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या ८७ मनोरुग्णांना मुक्त वातावरणात राहता येणार आहे. मानसिक व शारीरिकदृष्ट्या स्थिर असलेल्या ५२ मनोरुग्णांची ‘जागृती’ पुनर्वसन केंद्रात रवानगी केली जाईल तर मानसिक आजारातून बरे झालेल्या; पण पॅरालिसिस, दिव्यांग अशा इतर आजाराने त्रस्त असलेल्या ३५ जणांची रवानगी विशेष पुनर्वसन केंद्रात केली जाणार आहे. तेथे त्यांची देखभाल करण्याकरिता कर्मचारी तैनात असतील. 

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात १५ जणांना तर आता २९ जणांना जागृती पुनर्वसन केंद्रात पाठविण्यात आले. अन्य जणांची टप्प्याटप्प्याने तपासणी करून पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले. 

कलागुणांना दिला जातो वाव१८ ते ५५ वयोगटातील २९ पैकी १४ महिला, तर १५ पुरुषांना ‘जागृती’मध्ये पाठवले आहे. दिव्यांग, गतिमंद मनोरुग्णांसाठी विशेष पुनर्वसन केंद्राची व्यवस्था केली जाणार आहे. मनोरुग्णालयातून या केंद्राची नावे पाठवली असली तरी शासन स्तरावर योग्य ती पुनर्वसन केंद्राची पडताळणी करून त्यांना ठेवले जाईल, असे डॉ. मुळीक म्हणाले. तेथे त्यांच्या अंगी असलेल्या कला, कौशल्यांना वाव देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास प्रवृत्त केले जाते. 

सध्या मनोरुग्णालयात ७८५ मनोरुग्ण -    सध्या मनोरुग्णालयात ७८५ मनोरुग्ण असून पैकी ४९१ पुरुष, तर २९४ स्त्री मनोरुग्णांची संख्या आहे. यातील किती तरी मनोरुग्ण हे औषधोपचाराने बरे झाले आहेत. -    ‘मेंटल हेल्थ केअर’ कायद्यानुसार २०१७ नुसार मानसिकदृष्ट्या बरे झालेल्यांना मनोरुग्णालयात ठेवता येत नाही; परंतु काहींचे नातेवाईक असून स्वीकारत नाही तर काहींचे नातेवाईक सापडत नाही, अशा रुग्णांचे करायचे काय, असा प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा त्यांना शासनाने पुनर्वसन केंद्राची वाट मोकळी करून दिली. 

 

टॅग्स :thaneठाणे