शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

२८९ शिक्षकांची दिवाळी अंधारात ? पगार दोन महिने थकला : सानुग्रह अनुदानाचाही पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 02:47 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळेतील २८९ शिक्षकांचे दोन महिन्यांपासून पगार झालेले नाहीत. तसेच महापालिकेने जाहीर केलेले १२ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानही त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळेतील २८९ शिक्षकांचे दोन महिन्यांपासून पगार झालेले नाहीत. तसेच महापालिकेने जाहीर केलेले १२ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानही त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. या प्रश्नावर महापालिका प्रशासनाकडून ठोस काही उत्तर दिले जात नाही. सरकारकडून अनुदान आल्यावर देऊ, असा सबुरीचा सल्ला देऊन बोळवण केली जात आहे. त्यामुळे शिक्षकांना दिवाळी अंधारातच साजरी करावी लागणार आहे.प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष नरेंद्र सोंजे आणि सचिव निलेश वाबळे यांनी याविषयी महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे आॅक्टोबरच्या वेतनाची रक्कम अग्रीम स्वरूपात १०० टक्के शिक्षकांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे.महापालिकेच्या मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, तामीळ माध्यमांच्या ७३ शाळा आहेत. त्यातील जवळपास १० हजार ५०० विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम २८९ शिक्षक करत आहेत. या शाळांमध्ये ११ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. शिक्षकांना महापालिका निधी आणि राज्य सरकारच्या अनुदानातून पगार दिला जातो. ५० टक्के रक्कम महापालिका देते, तर राज्य सरकारकडून ५० टक्के अनुदान मिळते. मात्र, सरकारकडून अनुदानाची रक्कम महापालिकेस मिळालेली नसल्याने मागील वर्षभरापासून शिक्षकांचे पगार उशिराने होत आहे. एका शिक्षकाला किमान ४० हजार रुपये पगार मिळतो. जुलैचा पगार शिक्षकांच्या खात्यात आॅक्टोबरमध्ये पडला आहे. आॅगस्ट व सप्टेंबरचा पगार झालेलाच नाही. आॅक्टोबरचा पगार हा नोव्हेंबरमध्ये न देता तो अग्रीम स्वरूपात आॅक्टोबरमध्ये १०० टक्के जमा करावा, अशी मागणी शिक्षक संघाने केली आहे.दरम्यान, महापालिकेने दिवाळीनिमित्त १२ हजारांचे सानुग्रह अनुदान कर्मचाºयांना जाहीर केले आहे. मात्र, ही रक्कम घेण्यास कामगार संघटनांनी नकार देत मागील वर्षी इतकी १४ हजार ५०० रुपये रक्कम देण्याची मागणी केली होती. परंतु, हा तिढा सुटलेला नाही.

टॅग्स :diwaliदिवाळीTeacherशिक्षक