शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षांत दिव्यांग कल्याणासाठीचे २८ कोटी १३ लाख खर्चाविना वाया

By admin | Updated: April 25, 2017 00:08 IST

ठाणे महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी आणि नव्या योजना हाती घेतल्या आहेत.

ठाणे : ठाणे महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी आणि नव्या योजना हाती घेतल्या आहेत. यासाठी भरीव अशी आर्थिक तरतूदही केली आहे. परंतु, मागील सात वर्षांत दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणकारी योजनेसाठी मंजूर झालेल्या तब्बल ३४ कोटी २२ लाखांपैकी केवळ ६ कोटी ८ लाखांचा निधीच खर्च झाला असून उर्वरित तब्बल २८ कोटी १३ लाख रुपये खर्च झाले नसल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. ठाणे महापालिकेने यंदा दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना हाती घेतल्या असून यासाठी सुमारे ९ कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्तींना मोफत बस प्रवास, उपचार केंद्र, मोफत वैद्यकीय मदत, नाममात्र दरात शस्त्रक्रिया, पारितोषिक साहित्याचे वाटप, अंध व्यक्ती व विद्यार्थ्यांसाठी आॅडिओ लायब्ररी, दिव्यांगांकरिता नोंदणी केंद्र, दिल्लीच्या धर्तीवर स्कील डेव्हलपमेंट सेंटरची उभारणी करून त्या ठिकाणी स्कील असलेल्या स्थानिकांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी, प्रदर्शनासाठी एक मध्यवर्ती ठिकाण दिले जाणार आहे. कर्तव्य-कल्चर आॅफ केअर यासाठी तब्बल ५ कोटींची तरतूद केली आहे. यासह इतर विविध योजनांचादेखील समावेश केला आहे. दोन वर्षांपूर्वी या योजनांसाठी केवळ दोन कोटींचाच निधी दिला जात होता. त्यानुसार, मागील वर्षी या योजनांचा केवळ १०० ते १२५ अपंगांनीच लाभ घेतल्याची माहिती पालिकेने दिली आहे. परंतु, २०१४-१५ या आर्थिक वर्षात ८.५० कोटींची तरतूद केली होती. त्यानुसार, या योजनेची अंमलबजावणी करावी, यासाठी अपंग संघटनांनी पालिकेकडे पाठपुरावा केला होता. जानेवारी महिन्यात या योजनांचा लाभ अपंगांच्या हाती पडेल, असे पालिकेने स्पष्ट केले. परंतु, या कालावधीत जाहीर केलेल्या १३ योजनांपैकी एकाही योजनेवर पालिकेने खर्च केला नसल्याची बाब समोर आली आहे. तसेच मागील आर्थिक वर्षात या योजनेसाठी ९.५० कोटींची तरतूद केली होती. परंतु, हा निधीदेखील खर्च झाला नसल्याचेही समोर येत आहे. एकूणच मागील सात वर्षांत या कल्याणकारी योजनांमधील किती निधी खर्च झाला, कसा झाला, यासंदर्भात युसुफ खान यांनी माहिती अधिकारात माहिती मागवली होती. त्यानुसार, आठ वर्षांत या योजनांसाठी ३४ कोटी २२ लाखांच्या निधीची तरतूद केली होती. त्यापैकी केवळ ६ कोटी ८ लाख ५१ हजार ७६७ रुपयांचा खर्च झाला असून उर्वरित २८ कोटी १३ लाख ४८ हजार २३३ रुपयांचा निधी लॅप्स झाल्याचे त्यांना पालिकेने कळवले आहे. (प्रतिनिधी)