शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

 ठाण्यात २७५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ६ जाणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 21:23 IST

ठाणे शहर परिसरात ९५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ५९ हजार ४७९ झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे २७५ रुग्ण शनिवारी आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ५५ हजार ४८४ रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार १८० झाली आहे.   ठाणे शहर परिसरात ९५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ५९ हजार ४७९ झाली आहे. शहरात दोन मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ३६७ झाली. कल्याण - डोंबिवलीत ६८ रुग्णांची वाढ झाली असून दोन मृत्यू आहे. आता ६० हजार ५२९ रुग्ण बाधीत असून एक हजार १७७ मृत्यूची नोंंद आहे. 

उल्हासनगरमध्ये सहा रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ६५८ झाली. तर, ३६८ मृतांची नोंद आहे. भिवंडीला एकही बाधीत नसून एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ७२८ असून मृतांची संख्या ३५४ आहे. मीरा भाईंदरमध्ये १४ रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. या शहरात  बाधितांची संख्या २६ हजार ३८० असून मृतांची संख्या ८०० आहे.

अंबरनाथमध्ये तीन रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत आठ हजार ६१३ असून मृत्यू ३१२ आहेत. बदलापूरमध्ये १४ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत नऊ हजार ४१७ झाले आहेत. या शहरात एक मृत्यू  झाल्यामुळे मृत्यूची संख्या १२५ आहे. ग्रामीणमध्ये नऊ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू नाही. आता बाधीत १९ हजार २५८ आणि आतापर्यंत ५८७ मृत्यू आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे