शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

27 गावांतील पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटणार, जागा तातडीने हस्तांतरित करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 18:32 IST

सुभाष भोईर यांनी सुचवलेल्या सागाव, गावठाणच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेत जलकुंभासाठी जागा उपलब्ध होण्याकरिता गुरुवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंजुरी दिली.

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावात भीषण पाणी टंचाई असून ती सोडविण्यासाठी आमदार सुभाष भोईर यांनी सुचवलेल्या सागाव, गावठाणच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेत जलकुंभासाठी जागा उपलब्ध होण्याकरिता गुरुवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंजुरी दिली. अधिका-यांना जागेचा ताबा महापालिकेकडे तातडीने हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.सागाव येथील एमआयडीसीच्या उपलब्ध असलेल्या जागेमध्ये जलकुंभ बांधल्यास येथील बारा ते पंधरा गावांना मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होऊ शकेल मात्र जागेअभावी व जलकुंभ नसल्याने सध्या २७ गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यासाठी भोईर यांनी घेऊन जलकुंभ बांधण्याकरीता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यावर मंत्रालयात झालेल्या बैठकीत सागाव येथील ३५०० स्क्वेअर मी. जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचे भोईर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.तसेच अमृत योजनेतून महापालिकेने तातडीने जलकुंभ बांधून संप व पंप बांधणी करावी अशा सूचनाही उद्योगमंत्र्यानी केल्या आहेत. यामुळे २७ गावातील सागाव, सागर्ली, नांदिवली, स्टार कॉलनी, पी अँड टी कॉलनी, संघवी गार्डन, संजय नगर, चेरा नगर, मानपाडा, माणगाव, सोनार पाडा, आजदे, भोपर, देसले पाडा, नवनीत नगर या विभागाला पाणीपुरवठा उपलब्ध होऊ शकेल. या बैठकीला उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, एमआयडीसी अधीक्षक अभियंता सुभाष तुपे, उपअभियंता मनोज कुलकर्णी, कल्याण डोंबिवली मनपा कार्यकारी अभियंता राजीव पाठक, योगेश म्हात्रे उपस्थित होते.