शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

२३ लाख ठाणेकरांच्या बोटाला लागणार तब्बल २७ लीटर शाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:45 IST

ठाण्यासाठी लागणार शाईच्या दोन हजार ७०० बाटल्या

- सुरेश लोखंडे ठाणे : मतदानाचा हक्क बजावणे, हे प्रत्येक नागरिकाचे प्रथमकर्तव्य आहे. लोकसभा निवडणुकीच्या या मतदानासाठी डाव्या हाताच्या अंगठ्याजवळील तर्जनीवर शाई लागलेली दिसून आल्यास मतदानाचे कर्तव्य पार पाडल्याचे लक्षात येते. ठाणे लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यादिवशी ठाणे लोकसभेचे २३ लाख सात हजार २३२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यांच्या बोटाला सुमारे २७ लीटर निळी शाई लावण्याचे नियोजन आहे.लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात ही निवडणूक होणार असून ठाणेकरांसाठी दोन हजार ७०० बाटल्या इतकी निळी शाई लागणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ठाण्याप्रमाणेच कल्याण व भिवंडीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनीही या शाईचे नियोजन केले आहे.मतदानासाठी लागणाºया साहित्याची जुळवाजुळव जवळजवळ पूर्ण झाली आहे. यात निळी शाई अत्यंत महत्त्वाची असून त्याद्वारे मतदानाचा हक्क बजावल्याची ओळख पटते. सुमारे १५ दिवस तरी ती बोटाला दिसते. एका बाटलीत सुमारे १० मिली शाई असते. ठाणेकरांसाठी असलेल्या ३८१ ठिकाणी दोन हजार ४५२ मतदानकेंद्रे आहेत. तेथे या निळ्या शाईचा वापर होणार आहे. २००४ पर्यंतच्या मतदानासाठी केवळ निळ्या शाईचा एक ठिपका मतदाराच्या बोटाला लावला जात असे. पण, निवडणूक आयोगाने २००६ पासून मतदाराच्या डाव्या बोटावर शाईची सरळ रेषा आखण्याचे निर्देश दिले. यामुळे आता जास्त शाई लागते.कोणत्या बोटावर लागते शाईमतदानकेंद्रांवर मतदाराची ओळख पटवल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. जर तर्जनीवर शाई लागलेली असेल तर त्या मतदाराला मतदान करू दिले जात नाही.म्हैसूरची शाईसंपूर्ण देशात मतदानाच्या वेळी म्हैसूरची शाई वापरण्यात येते. येथील एका वॉर्निश कंपनीमध्ये ती तयार होते. या कंपनीपासून जगातील २५ देशांना निवडणूक शाईचा पुरवठा केला जातो. ही शाई तर्जनीवर लावल्यानंतर अजिबात पुसता येत नाही, अशी ख्याती या शाईची आहे.१९६२ च्या लोकसभा निवडणुकीत देशात सर्वप्रथम शाईचा वापर करण्यात आला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thaneठाणे