शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून २७ कोटी ५९ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 05:57 IST

इमारतीच्या बांधकामामध्ये पैसे गुंतवल्यास मोठ्या रकमेचा परतावा मिळू शकेल, असे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली.

ठाणे : इमारतीच्या बांधकामामध्ये पैसे गुंतवल्यास मोठ्या रकमेचा परतावा मिळू शकेल, असे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली.याप्रकरणी दादरच्या विजय अग्रवाल (७१) यांची २८ कोटी ५९ लाख १९ हजारांची फसवणूक करणाऱ्या संजय व प्रतिमा भालेराव या दाम्पत्यासह इतरांविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. आता हे प्रकरण ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहे.अग्रवाल यांना २०११ ते २८ मे २०१९ या आठ वर्षांच्या काळात एस.डी. भालेराव कन्स्ट्रक्शन्स प्रा.लि., एस.डी. भालेराव असोसिएट्स आणि मेसर्स क्राउन बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स या कंपन्यांमध्ये बांधकाम व्यवसायासाठी २२ कोटी ६४ लाख ७५ हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्याबाबत रजिस्ट्रेशन करून देण्यात आलेले रहिवासी आणि वाणिज्य गाळे हे बँक ऑफ इंडिया, पाचपाखाडी, ठाणे या बँकेकडे तारण ठेवलेले असतानाही ते आपल्याच मालकीचे असल्याचीही भालेराव यांनी बनावट कागदपत्रे तयार केली. तरीही, अग्रवाल यांच्याशी त्यांनी रजिस्ट्रेशन केले. तसेच अग्रवाल यांच्या गुंतवणुकीबाबत त्यांना तारण म्हणून दिलेले फ्लॅट आणि वाणिज्य गाळे वारंवार बदलून तेही दुसºयालाच विकून त्यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून अपहार केला. त्यासाठी वारंवार अग्रवाल यांनी पाठपुरावा करूनही त्यांची मुद्दल २२ कोटी ६४ लाख ७५ हजार व व्याज मिळून २८ कोटी ५९ लाख १९ हजार ४७० रुपये परत न केल्याने त्यांनी राबोडी पोलीस ठाण्यात २९ मे रोजी फसवणूक आणि अपहाराची तक्रार केली. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवल्याचे सूत्रांनी सांगितले.>गुंतवणुकीस भाग पाडलेबिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स या कंपन्यांचे मालक संजय आणि त्यांची पत्नी प्रतिमा भालेराव व त्यांच्या काही साथीदारांच्या संगनमताने चांगल्या परताव्याचे आमिष अग्रवाल यांना दाखवले.त्यांनी २०११ ते २८ मे २०१९ या आठ वर्षांच्या काळात एस.डी. भालेराव कन्स्ट्रक्शन्स प्रा.लि., एस.डी. भालेराव असोसिएट्स आणि मेसर्स क्राउन बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स या कंपन्यांमध्ये बांधकाम व्यवसायासाठी २२ कोटी ६४ लाख ७५ हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले.