शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे २६५ रुग्ण सापडले; तीन जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 19:56 IST

उल्हासनगरला पाच रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ६६३ झाली. तर, ३६८ मृतांची नोंद आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे २६५ रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. आता दोन लाख ५५ हजार ७४९ बाधितांची नोंद झाली. दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार १८३ झाली आहे.             ठाणे शहरात ६९ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ५९ हजार ५४८ झाली. शहरात एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ३६८ नोंदली. कल्याण - डोंबिवलीत ७७ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता ६० हजार ६०६ रुग्ण बाधीत असून एक हजार १७७  मृत्यूची नोंंद झाली आहे.             उल्हासनगरला पाच रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ६६३ झाली. तर, ३६८ मृतांची नोंद आहे. भिवंडीला एकही बाधीत व मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ७२८ असून मृतांची संख्या ३५४ आहे. मीरा भाईंदरमध्ये २३ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. या शहरात  बाधितांची संख्या २६ हजार ४३३ असून मृतांची संख्या ८०० झाली. 

     अंबरनाथमध्ये आठ रुग्ण आढळल्याने आता बाधीत आठ हजार ६२१ असून मृत्यू ३१२ झाले आहेत. बदलापूरमध्ये १७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत नऊ हजार ४३४ नोंदले आहेत. या शहरात मृत्यू  झाल्याने मृत्यूची संख्या १२५ कायम आहे. ग्रामीणमध्ये तीन रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू नाही. आता बाधीत १९ हजार २६१ आणि आतापर्यंत ५८७ मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या