शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

हृदय शस्त्रक्रियेमुळे २६ वर्षीय तरुणाला मिळाले नवे आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 15:01 IST

वैद्यकीय चाचण्या केल्या असता तरुणाच्या हृदयाला रक्तपुरवठा करणारी मोठी धमनी आणि त्याच्याजवळ असलेली झडपं निकामी झाल्याचं निदान झालं.

हृदयाला रक्तपुरवठा करणारी महाधमनीची ऍन्युरिझम (अवाजवी वाढ/फुगवटा आलेल्या) मुंबईतील एका २६ वर्षीय तरुणाला व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेमुळे नव्याने आयुष्य मिळाले आहे. मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात या तरुणावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राहुल रामचंद्रन (२६) असे या तरुणाचे नाव आहे.गेल्या सहा महिन्यांपासून या तरुणाला श्वास घेताना त्रास जाणवत होता. स्थानिक डॉक्टरांकडून औषधोपचार सुरू होते. परंतु प्रकृतीत काहीच फरक पडत नव्हता. अचानक त्रास वाढू लागल्याने त्याला दम लागायला सुरुवात झाली होती. साधारणतः कोरोनाची लक्षणं दिसू लागल्याने भीतीपायी कुटुंबीयांनी त्याला जुलै महिन्यात मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय चाचण्या केल्या असता तरुणाच्या हृदयाला रक्तपुरवठा करणारी मोठी धमनी आणि त्याच्याजवळ असलेली झडपं निकामी झाल्याचं निदान झालं.

अँओरटिक ऍन्युरिझम हा हृदयाच्या आजाराचा एक प्रकार आहे. यात हृदयाकडून अन्य अवयवांना रक्तपुरवठा करणाऱ्या मोठ्या रक्तवाहिनीमध्ये फुगवटा आला होता. मात्र, मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने व्हॉल्व्ह झडप आणि मुख्य रक्तवाहिनी शस्त्रक्रिया करून तरुणाचे प्राण वाचवले आहे.

याबाबत माहिती देताना मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील कार्डिओव्हस्कुलर आणि थोरॅसिक सर्जन डॉ. उपेंद्र भालेराव म्हणाले की, ‘‘हृदयाच्या धमनीचा तीव्र आजार हा तरुणांमध्ये क्वचितच आढळून येतो. हृदयाकडून शरीराला रक्तपुरवठा करणाऱ्या मोठ्या रक्तवाहिनीमध्ये दोष होता. यामुळे शरीरातील अन्य अवयवांना रक्तपुरवठा व्यवस्थित होत नव्हता. यामुळे हृदयाची पम्पिंग क्षमता खूपच कमी झाली होती. अशा परिस्थितीत अनेकदा धमनी फुटल्यामुळे छातीत रक्तस्त्राव झाल्यामुळे अचानक मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो. हे लक्षात घेऊन तातडीने हृदयावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय भाषेत याला एओर्टिक रूट रिप्लेसमेंट सर्जरी असं म्हणतात.ही हृदयविकाराची एक जटिल शस्त्रक्रिया आहे. यात कृत्रिम वाल्व आणि कृत्रिम रक्तवाहिनीद्वारे एओर्टा नावाची रक्तवाहिनी बदलली जाते. या शस्त्रक्रियेत महाधमनीचा आणि झडपेचा भाग काढून टाकण्यात येतो आणि त्याजागी नवीन झडप बसवली जाते. शस्त्रक्रियेनंतर त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला आता घरी सोडण्यात आले आहे’’, असेही डॉ. भालेराव म्हणाले. रुग्ण राहुल रामचंद्रन म्हणाले की, ‘‘हृदयाचा आजार असल्याचे निदान झाल्याने खूप घाबरून गेलो होतो. पण डॉक्टरांनी धीर दिल्याने मनातील भीती दूर झाली. आज फक्त डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे मला नव्याने आयुष्य मिळाले आहे. मी त्यांचा सदैव आभारी राहीन.’’