शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पातलीपाडा ब्रीजजवळ २६ टन पेंटचा ट्रक उलटल्याने वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 20:57 IST

घोडबंदर रोडच्या पातलीपाडा ब्रिज जवळ ते आल्यावर ट्रक उलटला.

जितेंद्र कालेकर (ठाणे), लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ब्रिज जवळ २६ टन एशियन पेंट कलर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामुळे वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाला होता. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रक रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक शाखेने दिली.एशियन पेंट कलरचा ट्रक घेऊन चालक निलेश मस्के हे खंडाळ्यावरून बडोद्याला निघाले होते. घोडबंदर रोडच्या पातलीपाडा ब्रिज जवळ ते आल्यावर त्यांचा ट्रक सकाळी उलटला.

या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक पोलीस , आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत मदतकार्य राबविले. याठिकाणी दोन हायड्रा मशीनच्या मदतीने पलटी झालेला ट्रक रोडच्या एका बाजूला करण्यात आला. दरम्यान, घोडबंदरकडे जाणाऱ्या रोडवर हा अपघात झाल्यामुळे पातलीपाडा ब्रिजच्या खालून जाणारा रोड सकाळी काही काळ वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे पातलीपाडा ब्रिजवरून घोडबंदरच्या दिशेने जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, या अपघातामुळे सुमारे तासभर वाहतूकीवर परिणाम झाल्यामुळे सकाळी ऐन कामावर जाण्याच्या वेळेत ठाणेकरांना कोंडीला सामोरे जावे लागले.

टॅग्स :thaneठाणे