शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
2
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
3
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
4
BMC Elections: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
5
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
6
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
7
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
8
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
9
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
10
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
11
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
12
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
13
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
14
Pisces Yearly Horoscope 2026: मीन राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रेमाचे आणि प्रगतीचे वर्ष; परदेश प्रवासासह उत्पन्नात होणार मोठी वाढ!
15
पत्नी असावी तर अशी! BMC निवडणूक लढवणाऱ्या समाधान सरवणकरांना तेजस्विनीची साथ, अभिनेत्रीचं होतंय कौतुक
16
‘मुंबई मनपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने उमेदवार उतरवणार’, सुनिल तटकरे यांची घोषणा
17
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
18
३१ डिसेंबरला स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि झेप्टोचे डिलिव्हरी बॉईज संपावर? कंपन्यांना किती फटका बसू शकतो
19
२०२६ वर्षारंभ गुरुवारी: एका पैशाचा खर्च नाही, कुठेही जायची गरज नाही; ‘अशी’ स्वामी सेवा करा!
20
गांधी कुटुंब एकत्र भेटते, तेव्हा काय गप्पा रंगतात? प्रियंकांचा मुलगा रेहान वाड्रा म्हणतो...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागात 26 टक्के, तर ‘आरोग्य’ची 49 टक्के पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 00:25 IST

रिक्त पदे त्वरित भरा : जि.प. उपाध्यक्षांचे राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना साकडे 

लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : पालघर जिल्ह्याचे विभाजन होऊन सहा वर्षे पूर्ण झाली असूनही आजही जिल्हा परिषद विभागात रिक्त पदे भरली गेलेली नाहीत. त्यामुळे ही पदे तात्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती नीलेश सांबरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

पालघर जिल्ह्याच्या आदिवासी ग्रामीण भागात आरोग्य आणि शिक्षण या किमान गरजा पूर्ण व्हाव्यात, तसेच कुपोषणाच्या घटनेने दिलेला अशिक्षितपणा मिटविता येईल, जनसामान्य आदिवासी माणसांचा व सर्वसामान्यांना हक्क मिळविण्यासाठी शिक्षण व आरोग्य विभागातील ६० ते ७० टक्के पदे तत्काळ भरण्यात यावीत, जेणेकरून आदिवासी ग्रामीण भागात सर्वसामान्य ग्रामस्थांना उत्तम आरोग्यसेवा आणि विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यास मदत होईल, असे पत्र जि. प. उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्य सचिवांना दिले आहे.

ग्रामीण भागात शिक्षणाची जबाबदारी शिक्षकांवर अवलंबून असते. आजही जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. शासनाने शाळाबाह्य वर्ग सुरू केले आहेत. मात्र, शिक्षक संख्या अपुरी आहे. यामुळे शासनाने शिक्षकांची संख्या नियमित केली, तर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची रुची वाढेल आणि या भागाचा विकास होण्यास मदत होईल.

जिल्ह्यामध्ये आराेग्य सेवेचा बाेजवाराnदुसरीकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आरोग्य सेवांचा बोजवारा उडालेला बघावायस मिळत आहे. जिल्ह्यामध्ये अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. अत्यवस्थ रुग्णांना ॲम्ब्युलन्स मिळत नाहीत. योग्य वेळी औषधेही मिळत नाहीत. nपरिणामी अशा गरजवंत रुग्णांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागतो. अशा शेकडो घटना जव्हार आणि मोखाडासारख्या आदिवासीबहुल ग्रामीण भागात घडलेल्या आहेत, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.