शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

२७ गावांकडे २५२ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:21 IST

मालमत्ता कर न भरण्याकडे कल : केवळ १५ कोटी ३४ लाखांचीच वसुली

कल्याण : केडीएमसीचा मालमत्ता कर हा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत आहे. या करापोटी आजपर्यंत पालिकेच्या तिजोरीत २७० कोटी जमा झाले आहेत. यामध्ये २७ गावांतून केवळ १५ कोटी ३४ लाखांचीच भर पडली आहे. या गावांकडे थकबाकी आणि सध्याची असे एकूण २५१ कोटी ८२ लाख रुपये येणे बाकी आहे. केडीएमसी हद्दीतून २७ गावे वगळण्याचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने येथील नागरिक कर भरण्याबाबत संभ्रमावस्थेत आहेत.

२७ गावे महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी तेथे ग्रामपंचायतीकडून अत्यल्प कर घेतला जात होता. नियमानुसार गावे महापालिकेत समाविष्ट केल्यावर त्यांना महापालिकेच्या दराप्रमाणे मालमत्ता कर आकारता येत नाही. त्यामुळे तीन वर्षांनंतर नियमित कर घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. तीन वर्षांनी दर वर्षाला २० टक्के करवाढ मालमत्ता कर आकारला जाईल. महापालिकेने २७ गावांतील मालमत्तांना आठ पट जास्तीची मालमत्ता कराची बिले पाठविली. त्यामुळे त्याला नागरिकांनी विरोध करत जास्तीचा कर भरणार नाही असा पवित्रा घेतला. तसेच ही गावे महापालिकेतून वगळण्याच्या शक्यतेमुळे ते कर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. सरकारकडून त्याबाबत निर्णय होत नसल्याने पालिकेच्या तिजोरीला त्याचा फटका बसत आहे.

महापालिकेला अपेक्षित करवसुली २७ गावांतून होत नाही. २७ गावांसाठी राज्य सरकारने केंद्राच्या अमृत योजनेनुसार पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. ही योजना आधी १८० कोटींची होती. त्यात वाढीव निधी सरकारने नुकताच दिला आहे. १९२ कोटी एकूण निधी मंजूर केला आहे. २७ गावांसाठी योजना मंजूर केली जात आहे. मात्र त्याठिकाणच्या नागरिकांकडून कर भरला जात नाही.महापालिकेच्या अन्य प्रभागांतून मालमत्ता कराची चालू मागणी ४१९ कोटी रुपयांची आहे. तसेच थकीत मालमत्ता कराची वसुली ७२७ कोटी आहे. आत्तापर्यंत महापालिकेच्या तिजोरीत २७० कोटी जमा झालेले आहे. चालू मागणीपोटी १७८ कोटी वसुली झाली आहे. थकबाकीपोटी महापालिकेने ९१ कोटी नऊ लाखांची वसुली केली आहे. थकबाकीच्या ७२७ कोटींची मालमत्ता वसुलीपैकी केवळ ९१ कोटी नऊ लाख रुपये वसुली होणे म्हणजे एकूण थकबाकी वसुलीच्या रकमेत केवल १० टक्केच वसुली झाली आहे.

महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडून जप्ती, पाणीपुरवठा खंडित करणे ही कारवाई हाती घेतली असली तरी थकीत रक्कम वसूल होत नसल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या थकबाकीविरोधात अनेकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. काही मालमत्तांना दोन वेळा कर आकारणी झालेली आहे. काही मालमत्ता या महापालिकेच्या, तर काही सरकारी आहेत. त्यामुळे थकबाकीची रक्कम जास्त दिसत आहे.लक्ष्य गाठण्यासाठी ८० कोटींची अपेक्षामहापालिकेस थकबाकी आणि चालू मालमत्ता कराची मागणी पाहता एकूण ११५७ कोटी वसूल होणे अपेक्षित आहे. मात्र, विविध अडचणींमुळे ही रक्कम वसूल होणे शक्य नाही. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्ता विभागाने करवसुलीचे लक्ष्य हे ३५० कोटींचे ठेवले आहे.त्यापैकी २७० कोटी वसूल झाले आहेत. महापालिकेच्या हातात आत्ता ३४ दिवसांचा कालावधी अद्याप शिल्लक आहे. आणखीन ८० कोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा होणे अपेक्षित आहे. तरच ३५० कोटींच्या वसुलीचे लक्ष्य गाठता येईल.बिल्डरांकडूनही प्रतिसाद नाही : ओपन लॅण्ड टॅक्स कमी केल्यावर ओपन लॅण्ड थकबाकी पोटी महापालिकेच्या तिजोरीत २०० कोटी रुपये जमा होणे अपेक्षित होते. महापालिकेने बिल्डरांसह सरसकट सगळ्यांना कर भरण्यासाठी अभय योजना लागू केली. या योजनेतून महापालिकेच्या तिजोरीत एक हजार कोटी जमा होणे अपेक्षित होते. महापालिकेच्या तिजोरीत केवळ ६७ कोटी अभय योजनेनंतर जमा झाले होते. बिल्डरांना ओपन लॅण्डमध्ये सूट देऊन ते कर भरत नसल्याबाबत आयुक्त व महापौरांनी एका बिल्डरांच्या कार्यक्रमात उल्लेखही केला होता.