शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

२५००० बोगस रिक्षा बुलडोझरखाली चिरडा; कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघ झाला आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 03:19 IST

ठाणे रिजनमध्ये २५ हजार अवैध रिक्षा धावत असून कारवाईदरम्यान ज्याज्या अवैध रिक्षा सापडतील, त्या सर्व रिक्षांवर तत्काळ बुलडोझर फिरवावा, तरच त्यांना आळा बसेल, अशी मागणी बुधवारी कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी रिक्षा-टॅक्सी पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली.

ठाणे : ठाणे रिजनमध्ये २५ हजार अवैध रिक्षा धावत असून कारवाईदरम्यान ज्याज्या अवैध रिक्षा सापडतील, त्या सर्व रिक्षांवर तत्काळ बुलडोझर फिरवावा, तरच त्यांना आळा बसेल, अशी मागणी बुधवारी कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी रिक्षा-टॅक्सी पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली.सध्या सुरू असलेल्या रिक्षा परमिटवाटपामुळे जो तो रिक्षामालक होऊ पाहत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांची फळीच संपुष्टात आली आहे. त्यातच, परमिट घेण्यासाठी रिक्षावाल्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाल्याने भविष्यात कर्जबाजारी होऊन त्यांच्यावरही शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्येची वेळ येईल. त्यामुळे लोकसंख्या लक्षात घेऊन परमिटचे वाटप करावे, असे त्यांनी सुचवले.ओला आणि उबेर यांच्यामुळे रिक्षावाल्यांचे नुकसान झाले आहे, असे सांगत पेणकर यांनी त्या कंपन्या बेकायदा खाजगी प्रवासी वाहतूक करत आहेत. तसेच त्यांना कोणतेही कायदे, नियमांचे बंधन नाही. त्यामुळे त्यांना कायद्याच्या कक्षेत आणावे आणि मगच परवानगी द्यावी, अशी मागणी केली. काल रिक्षा बॅज घेतलेल्या आणि वास्तव्याचा दाखला नसलेल्यांनाही रिक्षा परमिट मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. बॅज मिळाल्यानंतर तीन वर्षे पूर्ण झाल्यावर परमिटचे वाटप करावे तसेच रिक्षा आणल्यावर ते द्यावे, अशी मागणी केली. रिक्षा-टॅक्सीचे १० टक्के क्लेम (इन्शुरन्स) विमा पॉलिसी कंपनी यांच्याक डे होत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री, राज्य परिवहनमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा क रणार आहोत. तरीसुद्धा त्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या हिवाळी अधिवेशनात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही महासंघाने दिला.अडचणींवर झाली चर्चाठाणे जिल्हा कोकण विभाग आणि एमएमआरडीए क्षेत्रातील आॅटो रिक्षा, टॅक्सीचालकांच्या विविध अडचणी- समस्या, शासनाने रिक्षा, टॅक्सी मुक्त (खुले) केलेले परवाने बंद करावेत किंवा ५ ते १० वर्षांपर्यंत स्थगिती द्यावी, यासंदर्भात ठाण्यात रिक्षा-टॅक्सी महासंघाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा हा मेळावा झाला.न जुमानणारी पिढीरिक्षा चालवण्याच्या व्यवसायात येणे सोपे असल्याने दररोज ५० ते १०० जण त्यात उतरत असल्याने एकीकडे त्यांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये १६ ते १७ वर्षीय मुलांचाही समावेश आहे. पण ही मंडळी कोणत्याही युिनयनला जुमानत नाही. नियम पाळत नाहीत, असा आक्षेप घेण्यात आला.

टॅग्स :thaneठाणे