शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दिव्याच्या म्हात्रे वाडीतील २५० कुटुंबे १२ तास पाण्यात, संयुक्त बैठक बोलावून नुकसानभरपाई द्यावी, शानू पठाण यांची मागणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 16:20 IST

दिवा पंचक्रोशीतील शीळ- कल्याण मार्गावरील म्हात्रे वाडीतील ब्रिटीशकालीन मोठा नाला बुजविल्यामुळे याठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी पहाटे २ वाजता झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण परिसर जलमय झाला

ठाणे - दिवा पंचक्रोशीतील शीळ- कल्याण मार्गावरील म्हात्रे वाडीतील ब्रिटीशकालीन मोठा नाला बुजविल्यामुळे याठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी पहाटे २ वाजता झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण परिसर जलमय झाला असून येथील अडीचशे कुटुंबांना सुमारे बारा तास पाण्यात रहावे लागले. या नागरिकांवर येणारे हे संकट कायमचे दूर करण्यासाठी ठाणे महापालिकेने एमएमआरडीए, एमआयडीसी, विपक्ष नेते , स्थानिक नगरसेवक आणि रहिवाशांची संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अश्रफ शानू पठाण यांनी केली आहे.  दिवा प्रभाग समितीअंतर्गत म्हात्रेवाडी ही अडीचशे घराची वसाहत आहे. या भागातील  हा ओढा परिसरातील सर्व सांडपाणी तसेच पावसाचे पाणी वाहून नेत होता. मात्र, रस्ते बांधकाम प्राधिकरणाने या ठिकाणी रस्त्याचे बांधकाम करताना येथील मोरी आणि सबंध ओढाच बुजवून टाकला आहे. परिणामी, मोठ्याजास्त पाऊस झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत आहे. रविवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास अतिवृष्टी झाल्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. हे पाणी येथील नागरिकांच्या घरात सुमारे बारा तासाहून अधिक काळ तुंबले होते. या ठिकाणी विरोधीपक्ष नेते पठाण यांनी भेट दिली.  प्रशासनाच्या म्हणजेच रस्ते प्राधिकरणाच्या चुकीमुळे ही पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीमुळे येथील  नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने येथील  पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, संयुक्त बैठक बोलावून ही समस्या कायमची निकाली काढावी, अशी मागणी केली.

टॅग्स :Mumbaiमुंबईfloodपूर