शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत मेट्रो प्रकल्पामुळे होणार २५ हजार ठाणेकर विस्थापित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 00:47 IST

शहरात मूलभूत सुविधांचा अभाव असतानाच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सेना-भाजपा सरकारने ठाणेकरांसमोर १० हजार कोटींच्या अंतर्गत मेट्रोचे हे गाजर ठेवले आहे.

ठाणे : शहरात मूलभूत सुविधांचा अभाव असतानाच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सेना-भाजपा सरकारने ठाणेकरांसमोर १० हजार कोटींच्या अंतर्गत मेट्रोचे हे गाजर ठेवले आहे. या भूलथापांना भुलायला ठाणेकर वेडे आहेत का, असा सवाल करून या प्रकल्पामुळे अनेक लोक विस्थापित होणार आहेत. मात्र, आम्ही एकालाही उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी दिला आहे.राष्ट्रवादीने प्रसिद्धिपत्रक काढले आहे. अंतर्गत मेट्रोचा मार्ग पाहिल्यास सुमारे एक हजार इमारती बाधित होणार आहेत. या इमारती पाडल्यास सुमारे २५ हजार ठाणेकर निर्वासित होतील. त्यांची व्यवस्था कशी करणार, यावर कोणतेही भाष्य करण्यास हे सरकार तयार नाही. आज ठाणे शहरात चांगले रस्ते नाहीत. शौचालयांची व्यवस्था नाही. पाण्याची समस्या निकाली काढण्यात सेना-भाजपाला २५ वर्षांत यश आलेले नाही. किंबहुना, ते धरणाच्या प्रश्नावर गंभीर नाहीत. आता असे हजारो कोटींचे आकडे जाहीर करून अशी अशक्यप्राय मेट्रो ठाण्यात धावणार असल्याचे गाजर दाखवण्यात आले आहे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसने कळवा/मुंब्रा मेट्रोचा आग्रह धरल्यानंतर शिवसेनेने पोस्टर्स लावून ‘कळव्यात मेट्रो धावणार’ असे जाहीर केले होते. मात्र, आताच्या याअंतर्गत मेट्रोमध्ये कळवा- मुंब्य्राचा उल्लेखही नाही. कळवा-मुंब्य्राला सत्ताधारी शिवसेनेकडून अशीच सापत्न वागणूक दिली जात आहे. आता त्यांनी अशी वागणूक दिली, तर ती आम्ही सहन करणार नाही, असे आ. आव्हाड यांनी म्हटले आहे. एकंदरीतच पाण्यासाठी ठाणेकर मायभगिनी वणवण करत आहेत. धरणाबाबत या सत्ताधाऱ्यांची ठोस भूमिका येत नाही अन् आता हजारो कोटींची उड्डाणे करणाऱ्या अंतर्गत मेट्रोचे गाजर दाखवले जात आहे. ठाणेकरांना जे हवे आहे ते आधी द्या. शौचालये, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधा आधी द्या. सत्ताधाऱ्यांची निवडणुकीच्या आधीची ही कोट्यवधींची फसवी उड्डाणे ठाणेकरांना वेडे करतील, असा या लोकांचा गैरसमज आहे. त्यांनी आधी मूलभूत सुविधा पुरवाव्यात. ठाणेकरांना वेडे बनवणे आता थांबवावे, असेही त्यांनी म्हटले आहे.>नागरिकांना अनेक वर्षे सोसावा लागणार भुर्दंडस्मार्ट सिटीच्या पडताळणीमध्ये ठाणे शहर हे रसातळाला गेले आहे. तर, स्वच्छ शहरांच्या वरच्या यादीमध्ये ठाणे शहराला स्थानही मिळालेले नाही. शिवाय, या अंतर्गत मेट्रोमुळे ठाणेकरांना पुढील अनेक वर्षे भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्याची भरपाई कोण देणार आहे, असा सवाल आनंद परांजपे यांनी उपस्थित केला आहे.