शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीच्या अनामत रकमेसाठी २५ हजार रूपयांची चिल्हर

By सुरेश लोखंडे | Updated: April 8, 2019 17:26 IST

ठाणे लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. त्यासाठी आशिर्वाद घेण्यासाठी त्यांनी मतदारांचा आशिर्वाद घेतला. सुमारे आठ दिवस मतदारांच्या भेटीगाठी करीत असताना त्यांनी मित्रमंडळी, कार्यकर्ते, नातेवाईक आदींकडून अनामत रकमेसाठी नाण्यांच्या स्वरूपात आर्थिक मदत घेवून सुमारे २५ हजार रूपये प्राप्त केले.

ठळक मुद्देअनामत रकमेसाठी (डीपॉजिट) दहा रूपयांसह पाच , दोन, एक रूपया आणि ५० पैसे आदींची नाणी असलेली २५ हजार रूपयांची चिल्लर चिल्लर येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात मोजून दिली. त्यास सुमारे दीड तास लागल्याचे बोलले जात आहेया दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपली

ठाणे : येथील ठाणे लोकसभा मतदार संघासाठी मराठा क्रांती पुरस्कृत उमेदवार उमेदवारी दाखल करणार आहे. त्यासाठी भराव्या लागणाऱ्या अनामत रकमेसाठी (डीपॉजिट) दहा रूपयांसह पाच , दोन, एक रूपया आणि ५० पैसे आदींची नाणी असलेली २५ हजार रूपयांची चिल्लर येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात मोजून दिली. त्यास सुमारे दीड तास लागल्याचे बोलले जात आहे.                          या ठाणे लोकसभा मतदार संघातून मराठा क्रांती पुरस्कृत उमेदवार विनोद लक्ष्मण पोखरकर हे उमेदवारी दाखल करीत आहेत. अनामत रकमेसाठी २५ हजार रूपयांची नाणी असलेल्या दोन पिशव्या घेऊन ते सहकारी कार्यकर्त्यांसर्ह निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि मतदार यादीत नाव तपासणी सुरू केली, पण त्यांनी नंतर लक्षात आणून दिले की ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील घाटकोपर विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीत नाव सापडेल. यावेळी मात्र नाव तपासणे थांबवण्यात आले आणि घाटकोपर येथील मतदार यादीत नाव असल्याचा संबंधीत अधिकाऱ्यांचा दाखला आणण्यास त्यांना सांगण्यात आले.तत्पुर्वी अनामत रक्कम जमा करण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी संबंधीत काऊंटरवर दोन पिशव्यातील नाणी मोजून अनामत रकमेची पावती त्यांनी यावेळी प्राप्त केली. या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपली आणि त्यांनी ९ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे.ठाणे लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. त्यासाठी आशिर्वाद घेण्यासाठी त्यांनी मतदारांचा आशिर्वाद घेतला. सुमारे आठ दिवस मतदारांच्या भेटीगाठी करीत असताना त्यांनी मित्रमंडळी, कार्यकर्ते, नातेवाईक आदींकडून अनामत रकमेसाठी नाण्यांच्या स्वरूपात आर्थिक मदत घेवून सुमारे २५ हजार रूपये प्राप्त केले. नाण्यांच्या स्वरूपातून मिळालेला पोखरकर यांनी मतदारांचा आशिर्वाद मिळवला आणि तीच नाणी अनामत रक्कम म्हणून त्यांनी जमा केल्याचे त्यांचे सक्रीय सहकारी व मराठा क्रांती मोर्चाचे प्रवक्ते संतोष सूर्यराव यांनी लोकमतला सांगितले. नाणी मोजण्यासाठी सुमारे दीड तास उशिर झाल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज आता मंगळवारी म्हणजे ९ एप्रिलरोजी स्विकारण्यात येणार असल्याचेही ही सूर्यराव यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारीElectionनिवडणूक