शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

२४,३७५ जॉबकार्ड कुटुंब बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 23:00 IST

विक्रमगडमध्ये रोजगार हमीची फक्त ७० कामे; प्रशासन म्हणते ग्रा.पं.स्तरावरुन प्रस्तावच नाही

- संजय नेवे विक्रमगड : मागेल त्याला काम आणि काम करील त्याला दाम या तत्वाखाली सुरु असलेली महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार योजना विक्रमगड तालुक्यात तोकडी पडली आहे. तब्बल २४,७९५ येवढ्या मजूर कुटुंबाची नोंद असताना केवळ ४२० मजुर कुटुंबाना रोजगार मिळाला असून केवळ ७० ठिकाणी कामे सुरु आहेत. दरम्यान ग्रामपंचायतस्तरावरुन कोणतेही प्रस्ताव न आल्याने रोजगार हमीची कामे निघाली नसल्याचे प्रकल्प कार्यालयाकडून सांगण्यात आले.महात्मा गाधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावपाडयासह मजूराना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतस्तरावर असल्याने शंभर दिवस पुरेल एवढे काम मंÞजुर करून मागेल त्याला काम या ब्रीदवाक्याने तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतीत पैकी १५ ते २० ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमीची कामे सुरू आहेत. त्यापैकी डोल्हारीखु, सवादे, कासा, साखरे, दादडे, वेढेचरी, बोराडे, मोहो आंबेघर, खडकी केगवा या ग्रामपंचायत अंतर्गत घरकुलाची व शोषखड्ड्याची एकुण ७० कामे सुरू आहेत. मात्र, इतर ग्रामपंचायती अंतर्गत अजून कोणतीच कामे सुरू नसल्याने मजूराना काम शोधण्यासाठी फिरावे लागत आहेत.रोजगार हमीची कामे वेळेत सुरू झाली तरच मजूरांचे स्थालांतर होणार नाही व रोजगार हमीची कामे देखील होतील. तसेच, इतर यंत्रणेची कामे सुरू नसल्याने मजूरानी कामाची मागणी केली आहे. तालुक्यात काही जणांना रोजगार मिळाला असून बाकीच्या मजुरानी काय करायचे असा सवाल राजा गहला यांनी केला आहे.या घरकुलाच्या कामामुळे फक्त ४२० मजूर कुटुंबाना काम मिळाले आहे. असल्याची माहिती रोजगार हमी विभागाचे बाबासाहेब गायकवाड यांनी दिली. त्यामुळे हजारो हातांना गरज असूनही काम नसल्याची स्थिती आहे.तालुक्यातील मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यासाठी कामे सुरू करणे आवश्यक असताना कामे सुरू होत नाहीत त्यामुळे मजूराना स्थंलातर करावे लागत आहे. शेतीची कामे संपली असल्याने बिकट स्थिती आहे.

टॅग्स :palgharपालघर