शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी २४ लाखाचा निधी मंजूर; प्रदूषण दूर होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 18:13 IST

सामाजिक पर्यावरणवादी संस्थांचा सवाल

कल्याण-उल्हास नदीत विविध रासायनिक कंपन्याकडून योग्य प्रकारे प्रक्रिया न करताच रासायनिक सांडपाणी नदी पात्रत सोडले जाते. तसेच नदी पात्रत प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जाते. या विविध कारणामुळे नदी प्रदूषित झाली. हे प्रदूषण रोखण्यासाठी विविध सामाजिक पर्यावरणवादी संस्थांचा लढा सुरु आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हाधिका:यांनी 24 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे जाहिर केले आहे. याचे सामाजिक संस्थांनी स्वागत केले असले तरी इतक्या कमी निधीत प्रदूषणाचा प्रश्न सुटणार का असा सवाल या संस्थांच्या वतीने करण्यात आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच जिल्हा वार्षिक योजनेकरीता 445 कोटी रुपयांच्या खर्चास मंजूरी दिला आहे. यासाठी ठाणो जिल्ह्यातून जिल्हाधिकारी राजेश नाव्रेकर यांनी तीन प्रकल्पाचे सादरीकरण केले होते. त्यात उल्हास नदी प्रदूषण दूर करण्याचा विषयही होता. उल्हास नदी प्रदूषण रोखण्यासाठी २४ लाखाचा निधी त्यातून प्राप्त झाला आहे.  उल्हास नदी पात्रत प्रक्रिया न करता सांडपाणी, रासायानिक सांडपाणी सोडले जाते. नदी प्रदूषणाच्या विरोधात मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी तीन वेळा नदी पात्रत  ३६ दिवस बेमुदत उपोषण केले होते.  

त्याचबरोबर उल्हास नदी बचाव कृती समितीचे  रविंद्र लिंगायत यांनी ही आंदोलन केली आहेत. वनशक्ती या संस्थेची याचिका हरीत लवाद आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. जलपर्णीचा विळखा कायम आहे. चंद्रशेखर भडसावळे यांच्या संस्थेच्या माध्यमातून जलपर्णी हटविण्यासाठी ग्लायफोसेटची फवारणी केली गेली. जलपर्णी दूर होत असली तरी ग्लायफोसेट घातक आहे. त्याऐवजी दुस:या जैविक  पद्धतीचा वापर करावा असा मुद्दा पुढे येत आहे. जलपर्णी नदी पात्रत पुन्हा निर्माण न होता समूळ नष्ट व्हावी याकडे निकम यांनी लक्ष वेधले आहे. दिलेला निधी अत्यल्प असून किमान सुरुवात तरी झाली याविषयी विविध संस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. 

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उल्हास नदी प्रदूषण रोखण्यासाठी केंद्रीय मंत्री राजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे 211 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. त्याला अद्याप केंद्राकडून मंजूरी मिळालेली नाही.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर