हितेन नाईक, पालघरपालघर जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) एकूण ३२ जागासाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हापरिषद क्षेत्रामधून होणाऱ्या निवडणुकीकरीता सोमवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी २३ जागा बिनविरोध झाल्या असून आता ८ मार्च रोजी फक्त ९ जागांसाठी १२ उमेदवारांमध्ये निवडणुका रंगणार आहेत.पालघर जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील ५ जागासाठी होणाऱ्या निवडणुकीत कमळाकर दळवी - वांदीवली (पालघर), काशिनाथ चौधरी - मोडगाव (डहाणू), दिलीप गोटे - वशाळा (मोखाडा), अशोक भोये - देहरे (जव्हार), विजय खरपडे - बोर्डी (डहाणू), प्रकाश निकम - वाशाळा (जव्हार) अशा सहा उमेदवारांमध्ये निवडणुक रंगणार आहे.नगरपालिका क्षेत्रातील सर्वसाधारण एका जागेसाठी शिवसेनेचे नगरसेवक अतुल पाठक विरूद्ध राष्ट्रवादीचे नगरसेवक मकरंद पाटील यांच्यात लढत होणार आहे. महानगरपालिका क्षेत्रातून सर्वसाधारण प्रवर्गाच्या ३ जागासाठी लॉरेन डायस (वसई), उमेश नाईक (विरार), धनंजय गावडे (तुळींज), हार्दिक राऊत (विरार), असे ४ अर्ज असल्याने या उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे.जिल्हापरिषदेच्या अनुसूचित जमाती क्षेत्रात गीता धामोडे - कुर्झे (तलासरी), प्रमिला काकड - खडकी (विक्रमगड), सुरेखा मलावत - धानिवरी (डहाणू), मेरी रावत्या - खुबाळे (डहाणू), कौशिका डोंबरे - सावरोली (तलासरी), वैष्णवी रहाणे - भोपोली ( विक्रमगड) हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर सर्वसाधारण एका जागेसाठी दामोदर पिल्या पाटील, जलसार (पालघर) व सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या १ जागेसाठी चित्रा केणी तसेच नागरीकांच्या मागास प्रवर्गाच्या २ जागासाठी योगेश पाटील - मायखोप (पालघर) व निलेश गंधे (वाडा) व नागरीकांच्या मागासप्रवर्गासाठी महिलांच्या ३ जागासाठी धनश्री चौधरी - कुडूस (वाडा,) रंजना संखे - बोईसर (पालघर) व भावना विचारे - मान बोईसर (पालघर) या सर्व उमेदवारांमध्ये राजकीय पातळीवरून समझोता झाल्याने या १३ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.
माघारीच्या दिवशी २३ सदस्य बिनविरोध
By admin | Updated: March 1, 2016 01:59 IST