शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील २२५७८ असाक्षरांचा लेखी परीक्षेला उत्तम प्रतिसाद

By सुरेश लोखंडे | Updated: March 17, 2024 17:15 IST

शिक्षण खात्याच्या योजना विभागाकडून उल्लास- नवभारत साक्षरता हे अभियान जिल्हाभर राबविण्यात येत आहे. १

ठाणे : केंद्र पुरस्कृत उल्लास- नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी ठाणे जिल्ह्यातील असाक्षरांची पायाभुत साक्षरता आणि मुल्यमापन चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील २२ हजार ५७८ असाक्षरांनी ही परीक्षा दिली. स्त्री व पुरूषांचा सहभाग असलेल्या या परीक्षार्थीनी जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या एक हजार ६२८ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा दिली आहे. या परीक्षेला जिल्ह्याभरात उत्तम प्रतिसाद मिळाला असे शिक्षणाधिकारी (याेजना) भावना राजनाेर यांनी लाेकमतला सांगितले.            

जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर पार पडलेली ही परीक्षा वाचन, लेखन आणि संख्याज्ञान अशा तीन भागां घेण्यात आली. त्येकी ५० या प्रमाणे १५० गुणांची ही ऑफलाईन परीक्षा हाेती. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागात किमान ३३ गुण आवश्यक आहेत,या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एकत्रित हाेत्या. प्रत्यक्ष पेपरला तीन तासांचा कालावधी देण्यात आला. दिव्यांग व्यक्तींसाठी ३० मिनिटे जास्त वेळ दिला आहे. जिल्ह्यातील असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करुन त्यांचे साक्षरतेचे वर्ग घेतल्यानंतर आज त्यांची ही लेखी परीक्षा जिल्ह्यात घेण्यात आली.शिक्षण खात्याच्या योजना विभागाकडून उल्लास- नवभारत साक्षरता हे अभियान जिल्हाभर राबविण्यात येत आहे. १५ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या असाक्षरांना साक्षर बनवण्यासाठी हा उपक्रम आहे. यामध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, जीवन कौशल्ये विकसित करणे हे मुख्य उद्दीष्ठ या अभियानाचे आहे, त्यात लेखन, वाचन, संख्याज्ञानासह आर्थिक साक्षरता, कायदा आणि डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्यनिहाय बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण अशा घटकांचा समावेश आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, गटस्तरीय, केंद्रस्तरीय, शाळास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून ही परीक्षा आज घेण्यात आली.