शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कळवा रुग्णालयातील २१ तर महापालिकेच्या आरोग्य विभागातील पाच अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 15:46 IST

कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतांना आरोग्य सेवा देणाऱ्या कळवा हॉस्पीटलमधील तब्बल २१ जणांना आता कोरोनाची लागण झाली आहे. तर येथील एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागातील पाच जणांनाही आता कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठाणे : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून आता ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आतापर्यंत तब्बल २१ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे यातीलच एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्याने महापालिका मुख्यालयातील आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अन्य तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाशी लढा देणारा हा विभागच आता सील करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील ३५ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही होम क्वॉरान्टाइन करण्यात आले आहे.            शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. परंतु त्यांच्यावर उपचार करणारेच वैद्यकीय अधिकारी देखील आता या कोरोनाच्या विळख्यात सापडण्यास सुरवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी कळवा रुग्णालयातील चार ते पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता हा आकडा थेट २१ वर जाऊन पोहचला आहे. यामध्ये ८ ते १० वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर उर्वरीत वैद्यकीय कर्मचाºयांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे येथील तीन ते चार विभाग सध्या सील करण्यात आल्याची माहिती डॉ. आर. टी. केंद्रे यांनी दिली. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी महापालिका मुख्यालयातील चवथ्या मजल्यावरील आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर हा विभाग एक दिवस सील करुन निर्जंतुकीकरण करण्यात आला होता. आता, मात्र आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कळवा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कोरोना बाबतच्या मिटींगसाठी महापालिका मुख्यालयात येत होते, त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्यांच्या संपर्कात आलेल्या आरोग्य विभागातील दोन वैद्यकीय अधिकारी आणि अन्य तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर ३५ जणांनाही आता होम क्वॉरन्टाइन करण्यात आल्याचेही केंद्रे यांनी स्पष्ट केले. आता चवथा मजल्यावरील आरोग्य विभाग पूर्णपणे सील करण्यात आला आहे. दरम्यान आता कळवा रुग्णालयातील त्या वैद्यकीय अधिकाºयाच्या पालिकेने अनेक महत्वाचे अधिकारी, कर्मचारी देखील संपर्कात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे त्यांच्याही चाचण्या येत्या काही दिवसात केल्या जाणार असल्याचेही बोलले जात आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या