शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

ठाणे लोकसभा मतदारसंघात २०२ मतदान केंद्र क्रिटीकल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 20:21 IST

ठाणे जिल्हह्याच्या तिन्ही लोकसभा मतदारसंघात २०१४ ला केवळ ६४२ मतदान केंद्रे क्रिटीकल म्हणून घोषीत करण्यात आली होती. यंदाच्या या निवडणुकीला फक्त ठाणे लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघात २०२ क्रिटीकल मतदान केंद्रे घोषीत झाली आहे. यामुळे उर्वरित दोन मतदारसंघात क्रिटील मतदान केंद्रांची संख्या मोठ्याप्रमाणात राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ठळक मुद्देगेल्या निवडणुकीत ९० टक्के मतदान झालेले७५ टक्के मतदान एकाच उमेदवारास मिळालेला निकष विचारातमतदान केंद्रात जास्तीत जास्त मतदारांकडे फोटो नसलेले मतदार ओळखपत्र

ठाणे : पोलिस यंत्रणेसह निरिक्षकनिवडणूक यंत्रणांनी ठाणे लोकसभा मतदार संघाच्या दोन हजार ४५२ मतदान केंद्रांपैकी २०२ केंद्र क्रिटीकल म्हणून घोषीत केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी निदर्शनात आणून दिले आहे. यामुळे या मतदार केंद्रांसाठी जादा पोलीस बळासह राज्य राखीव दलाच्या तुकड्या (एसआरपीएफ), मतदान केंद्रांचे लाईव प्रक्षेपण, मतदारांचे छायाचित्रीकरण, इन कॅमेरा मतदान आदींची खास उपाययोजना केली जाणार आहे.केंद्रीय निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सेंटर मॅजिस्टक आणि पोलिस यांच्यातील एकमताने ठाणे लोकसभेच्या क्रिटीकल मतदान केंद्रांची निवड करण्यात आली. या क्रिटीकल मतदान केद्रांसाठी विविध निकष लावण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने मतदान केंद्रावर गेल्या निवडणुकीत ९० टक्के मतदान झालेले असावे, यातील ७५ टक्के मतदान एकाच उमेदवारास मिळालेला निकष विचारात घेतला आहे. याप्रमाणेच मतदान केंद्रात जास्तीत जास्त मतदारांकडे फोटो नसलेले मतदार ओळखपत्र असणे, एकाच परिवारातील मतदार एकत्र येण्याऐवजी एकएक करून (सिंगल ओटर) मतदान केलेल्या मतदारांची संख्या जास्त असणे, रेसिडेंसिएल मतदार जास्तीत जास्त असणे इत्यादी निकषांवर हे क्रिटीकल मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.ठाणे जिल्हह्याच्या तिन्ही लोकसभा मतदारसंघात २०१४ ला केवळ ६४२ मतदान केंद्रे क्रिटीकल म्हणून घोषीत करण्यात आली होती. यंदाच्या या निवडणुकीला फक्त ठाणे लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघात २०२ क्रिटीकल मतदान केंद्रे घोषीत झाली आहे. यामुळे उर्वरित दोन मतदारसंघात क्रिटील मतदान केंद्रांची संख्या मोठ्याप्रमाणात राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे मतदारसंघाच्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये हे २०२ मतदान केंद्रे ११६ ठिकाणी आहेत. यामध्ये मीरा भार्इंदर विधानसभा मतदार संघात ३४ मतदान केंद्रे क्रिटीकल आहेत. याप्रमाणेच ओवळा माजीवडा विधानसभेतील ३५ मतदान केंद्रे, कोपरी पाचपाखाडी विधानसभेत ३० केंद्रे, ठाणे विधानसभेत २७ केंद्रे, ऐरोलीत ३७ आणि बेलापूरमध्ये ३९ मतदान केंद्रे क्रिटीकल म्हणून घोषीत केली आहेत. यामुळे या मतदान केंद्रांवर एसआरपीएफच्या जवानांसह कडक पोलीस बंदोबस्त, इन कॅमेरा मतदारासह छायाचित्रीकरण आणि मतदान केंद्रांमधील प्रत्येक हालचालीवर लाईव प्रक्षेपण निवडणूक आयोगाकडे होणार आहे.

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक