शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांच्या २०० गाड्या तोडल्या; भाईंदर पालिकेची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 03:03 IST

मीरा-भाईंदरमध्ये रस्ते-पदपथ बळकावणारे फेरीवाले आणि हातगाड्यामाफियांचा धुमाकूळ सुरू आहे

मीरा राेड : कोरोनाच्या संसर्गामुळे निर्बंध असताना मीरा- भाईंदरमध्ये रस्ते-पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाले आणि हातगाडीवाल्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा होत असून कोरोना संसर्गाच्या नियमांचेसुद्धा उल्लंघन केले जात आहे. मीरा रोडच्या नयानगर भागातील नवीन सिमेंटचा रस्ता बळकावणाऱ्या फेरीवाल्यांच्या २०० हातगाड्या जेसीबीने तोडून टाकण्याची कारवाई बुधवारी महापालिकेने केली.

मीरा-भाईंदरमध्ये रस्ते-पदपथ बळकावणारे फेरीवाले आणि हातगाड्यामाफियांचा धुमाकूळ सुरू आहे. बाजारवसुली करणारे ठेकेदार यांचे राजकीय व प्रशासकीय लागेबांधे पाहता ठेकेदार मनमानी बाजारशुल्क वसूल करतात. शिवाय, नवनवे फेरीवाले आणून बसवले जातात. यामध्ये काही नगरसेवक, राजकारण्यांपासून पालिका अधिकारी यांचे अर्थपूर्ण साटेलोटे असल्याने फेरीवाल्यांवर ठोस कारवाई केली जात नाही, असा आरोप केला जात आहे. उच्च न्यायालयाने रेल्वेस्थानकापासून १५० मीटर तर शाळा, कॉलेज, रुग्णालय, धार्मिकस्थळांपासून १०० मीटरच्या आवारात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई केली असतानाही सर्रास फेरीवाले अतिक्रमण करतात.पालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून नव्याने बनवलेल्या सिमेंट रस्त्यांवरसुद्धा फेरीवाले आणि त्यांच्या हातगाड्यांचा विळखा पडलेला आहे. नयानगर भागात नव्याने बांधलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर फेरीवाले कब्जा करून भरमसाट हातगाड्या लावत आहेत. वाहतुकीची कोंडी होत असल्याने फेरीवाल्यांस गाडी बाजूला घे सांगितले तरी ते दादागिरी करतात. रस्त्यांवर फेरीवाल्यांचा कब्जा, त्यातच मास्क न घालणे व होणारी गर्दी पाहता कारवाईची मागणी जागरूक नागरिकांकडून होत होती.

प्रभाग अधिकारी कारवाई करत नसल्याने आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी शहरातील रस्ते-पदपथांवरील फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण, रहदारीला होणारा अडथळा व वाहतूककोंडी आदींच्या अनुषंगाने कारवाईचे आदेश दिले होते. बुधवारी उपायुक्त अजित मुठे यांच्यासह सर्व प्रभाग अधिकारी, कर्मचारी, पोलीस व बाउन्सर आदींच्या उपस्थितीत पालिकेने सुमारे २०० हातगाड्या जेसीबीने तोडून टाकल्या.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक