शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

मृत तरुणाच्या आईला २० लाख देत सेटलमेंट; मुरबाड येथे उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 08:28 IST

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी नेऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुरबाड : तालुक्यातील सरळगावातील कृष्णा हाॅस्पिटलमध्ये समीर बांगर (वय ३०, रा. खरीड) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतप्त नातेवाइकांनी डॉ. रविशंकर पाल यांना जाब विचारला. यावेळी त्यांनी मृताच्या आईला २० लाख रुपयांची भरपाई देऊन तडजोड केल्याचे समोर आले.

खरीड गावातील समीर बांगर याच्या मानेला गाठ आली होती. तो सरळगाव येथील डॉ. रविशंकर पाल यांच्या कृष्णा हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी आला होता. गाठीचे रात्री ऑपरेशन करीत असताना रक्तस्राव होऊ लागला. यामध्ये समीर बेशुद्ध पडला. परंतु, त्याची कोणत्याही प्रकारे हालचाल होत नसल्याने डॉ. पाल यांनी त्याला पुढील उपचारासाठी मुरबाडमधील राॅयल हॉस्पिटलमध्ये पाठविले. मात्र, तेथील डॉक्टरांनी समीर मृत असल्याचे सांगितले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. 

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी नेऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, नातेवाइकांमध्ये झालेला उद्रेक पाहता डॉ. रविशंकर सिंग यांनी मृताच्या आईला २० लाखांची भरपाई दिली असली, तरी हे प्रकरण गुलदस्त्यात असल्याने आरोग्य यंत्रणेबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी चर्चा करण्यात येत आहे.

घटनेची या कार्यालयात कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध झाली नाही. त्याची तालुका स्तरावरून माहिती घेऊन उचित कार्यवाही केली जाईल.- डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे

टॅग्स :doctorडॉक्टर